Yerwada Crime : येरवड्यात मध्यरात्रीच्या सुमारास दहा ते बारा दुचाकींची तोडफोड; पोलिसात गुन्हा दाखल

येरवड्यातील कामराजनगर येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुंडांच्या टोळक्याने रात्री परिसरात दहशत निर्माण होईल असे वर्तन करून दहा ते बारा दुचाकी गाड्यांची तोडफोड करून नुकसान केले.
Bikes Damage
Bikes Damagesakal
Updated on
Summary

येरवड्यातील कामराजनगर येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुंडांच्या टोळक्याने रात्री परिसरात दहशत निर्माण होईल असे वर्तन करून दहा ते बारा दुचाकी गाड्यांची तोडफोड करून नुकसान केले.

विश्रांतवाडी - येरवड्यातील कामराजनगर येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुंडांच्या टोळक्याने रात्री परिसरात दहशत निर्माण होईल असे वर्तन करून दहा ते बारा दुचाकी गाड्यांची तोडफोड करून नुकसान केले. याप्रकरणी सराईत गुन्हेगार सुलतान रिजवाज शेख (वय21, रा. कोंढवा पुणे) व साजिद शेख उर्फ डीजे (वय 18, रा. कामराजनगर, येरवडा) यांच्यासह इतर चार ते पाच अनोळखी साथीदाराविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

गुरुवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास दीदार बेकरी, कामराजनगर येथे अचानक गुंड टोळक्याने हातात हॉकी स्टिकसह तलवारी व हत्यारे घेऊन गाड्यांची तोडफोड हातात हॉकी स्टिक सह तलवारी व हत्यारे घेऊन गाड्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून वस्तीतील लोक बाहेर आले. या जमावाने सुमारे दहा ते बारा दुचाकी गाड्यांचे तोडफोड करत नुकसान केले. या घटनेमुळे येरवडा परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ घेऊन पाहणी केली. गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींची नावे निष्पन्न असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाले असल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली.

Bikes Damage
Purandar Airport : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीची नवीन जागा आर्थिक, भौगोलिक, तांत्रिकदृष्ट्या चांगली

दारू व गांजाच्या नशेत वारंवार गाड्यांची तोडफोड तसेच दहशत पसरवण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत मागील महिन्याभरापासून येरवडा तसेच शहरातील प्रमुख भागांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वत: पोलीस कर्मचार्‍यांसोबत पेट्रोलिंगसाठी फिरत असतात. त्यामुळे गुन्हयांचे घटले आहे. पण तरीही असे प्रकार घडत असल्याने सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. येरवडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.