‘पॅनेक्स-२१’साठी बिपिन रावत येणार होते पुण्यात

औंध मिलिटरी स्टेशन येथे २०१८ दरम्यान बिमस्टेक देशांच्या संयुक्त लष्करी सरावादरम्यान जनरल बिपिन रावत यांनी पुण्याला भेट दिली होती.
Bipin Rawat
Bipin RawatSakal
Updated on

पुणे - औंध मिलिटरी स्टेशन येथे २०१८ दरम्यान बिमस्टेक देशांच्या संयुक्त लष्करी सरावादरम्यान जनरल बिपिन रावत यांनी पुण्याला भेट दिली होती. त्यावेळी ते लष्कर प्रमुख होते. तर या वर्षी ते पुन्हा पॅनेक्स-२१ या सरावासाठी डिसेंबर महिन्यात पुण्यात येणार होते. मात्र, या वेळी ते सीडीएस प्रमुख म्हणून सहभाग घेणार होते.बिमस्टेक देशांच्या सदस्य राष्ट्रांसाठी मानवतावादी साहाय्य आणि आपत्ती निवारण यासाठी होणाऱ्या पॅनेक्स-२१ सराव २० ते २२ डिसेंबर या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आले आहे.

यामध्ये लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख आणि मित्र देशांचे प्रतिनिधी सहभाग घेणार आहेत. हा सराव भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड या देशांचा संयुक्त सराव आहे. यावर्षी पुण्यात होणाऱ्या पॅनेक्स-२१ या लष्करी सरावाच्या माध्यमातून मित्र देशांशी संबंध घट्ट करण्यावर त्यांचा प्रयत्न होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.