75 वर्षीय पुजाऱ्याची कमाल! कंबरेला दोरी बांधून ओढल्या 12 बैलगाड्या

दसऱ्यानिमित्त आयोजीत श्री. बिरोबा देवाच्या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
Bullock Cart
Bullock CartSakal
Updated on
Summary

दसऱ्यानिमित्त आयोजीत श्री. बिरोबा देवाच्या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पारगाव - जारकरवाडी, ता. आंबेगाव येथे पारंपारिक पध्दतीने दसरा सण उत्साहात साजरा करण्यात आला. दसऱ्यानिमित्त आयोजीत श्री. बिरोबा देवाच्या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ७५ वर्ष वय असणारे पुजारी गणपत येमना मंचरे यांनी कमरेला बांधलेल्या दोरीच्या साह्याने देवाच्या मानाच्या 12 बैलगाड्या ओढल्या हा पारंपारिक कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते.

या परिसरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. बिरोबा देवाच्या उत्सवानिमित्त गेली 10 दिवस किर्तन, भजनासह दररोज रात्री सवाद्य धनगरी ओव्या गायिल्या गेल्या. काल बुधवारी दसर्याच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता पुजारी गणपत मंचरे यांना पंरपरेनुसार हळद लावण्यात आली. त्यानंतर त्यांना झेंडुच्या फुलांच्या मुंडवळ्या बांधुन त्यांची ढोल, डफ व ताशांच्या गजरात बिरोबाच्या नावाने चांगभलच्या जयघोषात पिवळ्या धम्मक भंडार्याची उधळण करत ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी येथील तरुणांनी पारंपारिक धनगरी गजीनृत्य सादर केले. पांडुरंगाच्या मंदीरासमोर एकाला एक दोरीच्या साह्याने बांधलेल्या लाकडी बैलगाड्या पुजारी गणपत मंचरे यांनी कमरेला बांधलेल्या दोरीच्या साह्याने काही अंतर ओढत नेल्या. हा पारंपारिक कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते. यानंतर बिरोबाच्या मंदिरात महाआरतीचा कार्यक्रम झाला.

दसरा महोत्सवादरम्यान माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, अरुण गिरे, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, शरद बँकेचे संचालक दौलत लोखंडे, भीमाशंकरचे संचालक रामचंद्र ढोबळे, उद्योजक रमेश लबडे, सरपंच रुपाली भोजणे, सोसायटी अध्यक्ष सुर्यकांत लबडे आदींनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची व्यवस्था नवनाथ मंचरे, उत्तम मंचरे, रविंद्र भांड, लालु तागड, मंगेश भोसले, सत्यवान भोसले, ऩिवृत्ती भांड, अविनाश पवार, आनंदा भोजणे, पोपट भोजणे, व गावातील तरुणांनी पाहीली. सूत्रसंचालन नवनाथ जारकड, भागाजी भांड यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.