Pune News : जन्म-मृत्यू नोंदणीची ऑनलाइन प्रणाली ठप्प

जन्म-मृत्यू नोंदणी व दाखले देण्यासाठी वापरली जाणार ऑनलाइन प्रणाली ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
Birth & Death certificate
Birth & Death certificateesakal
Updated on

पुणे - जन्म मृत्यू नोंदणी व दाखले देण्यासाठी वापरली जाणार ऑनलाइन प्रणाली ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. ही प्रणाली केंद्र सरकारकडून महापालिकेला देण्यात आली आहे. त्यातील तांत्रिक अडचणींबाबत लेखी तक्रार केली आहे पण सुधारणा होत नसल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

शहरातील २०१९ पासून केंद्र सरकारच्या नागरी नोंदणी सॉफ्टवेअरमध्ये (सीआरएस) जन्म व मृत्यूची नोंदणी होते. त्यापूर्वी महापालिकेची प्रणाली होती, पण देशभर सर्वत्र एकसारखेच जन्म व मृत्यू दाखले दिले जावेत, यासाठी केंद्र सरकारने एक प्रणाली तयार केली आहे. याच प्रणालीचा वापर करणे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक आहे. काही महिन्यांपूर्वी या प्रणालीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

त्यामध्ये आत्तापर्यंत शहरात कोणत्याही भागात जन्म अथवा मृत्यू झाल्यास नागरिकांना महापालिकेच्या कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयातून जन्म-मृत्यूचे दाखल मिळत होते. पण २४ जून पासून या सॉफ्टवेअरमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले. त्यामध्ये ज्या क्षेत्रीय कार्यालयात जन्म किंवा मृत्यूची नोंद झाली आहे. तेथेच त्यांना दाखला मिळत आहे. याचा फटका अनेक नागरिकांना बसत असून, क्षेत्रीय कार्यालयांमध्ये खेटे मारावे लागत आहेत.

त्यातच ही प्रणाली अचानक बंद होत आहे किंवा त्याचे कामकाज मंदावत आहे. त्यामुळे दाखले घेण्यासाठी नागरी सुविधा केंद्रावर लांबच्या लांब रांग लागत आहे. नवीन दाखल्यांची नोंदणी करण्याचे कामही संथ गतीने होत आहे.

यासंदर्भात दोन आठवड्यापूर्वी झालेल्या बैठकीत पुणे महापालिकेसह जिल्ह्यातील डॉक्टरांनी व कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाकडे तक्रारींचा पाढा वाचला पण अद्याप त्यात सुधारणा झालेली नाही. आजही पुणे महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रातील यंत्रणा ठप्प झाली होती. त्याबाबत राज्य शासनाला पत्र पाठवून तक्रार केली जाणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.