बिटकॉइन प्रकरणात ईडीकडून तपास

ईडीच्या पथकाकडून पुणे पोलिसांकडून घेतली तपासाबाबतची माहिती
बिटकॉइन
बिटकॉइनsakal
Updated on

पुणे : बिटकॉईन (क्रिप्टोकरन्सी) या आभासी चलन फसवणूक प्रकरणात सक्तवसुली अंमलबजावणी संचलनायाकडून (ईडी) समांतर तपास सुरू करण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांकडून या गुन्ह्याच्या तपासाबाबतची माहिती घेतली आहे.

या गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील (रा. बिबवेवाडी) आणि संगणक तज्ज्ञ पंकज घोडे (रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशन) यांना अटक केली आहे. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्यांना ईडीकडून ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. पाटील याच्याकडे केलेल्या तपासात त्याने मोठ्या प्रमाणात क्रिप्टो करन्सी स्वत:च्या व त्याच्याशी इतर संबंधित व्यक्तीच्या वॉलेटवर घेतले असल्याचे दिसून आले आहे. त्याच्याकडून आत्तापर्यंत चालू बाजारभावाप्रमाणे सुमारे सहा कोटी रुपये किमतीचे विविध क्रिप्टो करन्सी जप्त करण्यात आली आहे.

तसेच आणखी क्रिप्‍टो करन्सी हस्तगत करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहे. आरोपींनी अपहार केलेल्या रक्कमेचा व त्यातून घेतलेल्या मालमत्तेचा शोध घेऊन ती जप्त करण्याचे कामकाज सध्या सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाज आणि अजय भारद्वाज (दोघेही रा. दिल्ली) यांच्याविरोधात दत्तवाडी आणि निगडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली होती. पाटील आणि घोडे यांनी आरोपींच्या वॉलेटमधील आभासी चलन स्वत:च्या खात्यात वळविल्याचे तपासात निष्पन्न झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.