court
courtsakal

बीटकॉईन फसवणूक प्रकरण : तथाकथित सायबर तज्ञ पंकज घोडेला जामीन

बिटकॉईन (क्रिप्टोकरन्सी) या आभासी चलन फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेला तथाकथित सायबर तज्ञ पंकज घोडे याला न्यायालयाने जामीन मंजूर केला.
Published on
Summary

बिटकॉईन (क्रिप्टोकरन्सी) या आभासी चलन फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेला तथाकथित सायबर तज्ञ पंकज घोडे याला न्यायालयाने जामीन मंजूर केला.

पुणे - बिटकॉईन (क्रिप्टोकरन्सी) या आभासी चलन फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेला तथाकथित सायबर तज्ञ पंकज घोडे याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी हा आदेश दिला.

५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि गुन्‍ह्यातील पुराव्यात छेडछाड न करण्याची अटींसह जामीन देण्यात आला आहे. बिटकॉईन प्रकरणात पोलिसांना तांत्रिक मदत करण्यासाठी नेमलेल्या घोडे (वय ३८, रा. ताडीवाला रोड) आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील (वय ४५, रा. बिबवेवाडी) यांनी मोठ्या प्रमाणात क्रिप्टोकरन्सी स्वत:चे व त्याच्याशी इतर संबंधित व्यक्तीच्या वॉलेटवर घेतले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. एप्रिल २०१८ पासून २०२२ दरम्यान हा प्रकार घडला.

घोडे हा दत्तवाडी व निगडी पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात पोलिसांना तांत्रिक तज्ञ म्हणून तपासास मदत करीत होता. यावेळी, तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी त्याकडे विश्वासाने दिलेल्या डेटाचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापर करून तांत्रिक अहवालाचे बनावटीकरण केले. त्याद्वारे, त्याने शासन व गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची क्रीप्टो करन्सी घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी त्याने ॲड. अमोल डांगे यांच्यावतीने न्यायालयात अर्ज केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.