Devendra Fadnvis : 'असं' उलगडणार पहाटेच्या शपथविधीचं रहस्य; चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा

bjp chandrakant patil on devendra fadnvis ajit pawar morning oath ceremony bypoll election
bjp chandrakant patil on devendra fadnvis ajit pawar morning oath ceremony bypoll election
Updated on

मागील काही दिवसांपासून अजीप पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपतविधीची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी तो शपतविधी शरद पवार यांची खेळी असल्याचे विधान केले होते त्यानंतर यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. आता यावर भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे नेते चंद्रकांत पाटील या प्रकरणी बोलताना म्हणाले की, काही प्रश्नांची उत्तरं कधीच मिळत नाही (पहाटेचा शपथविधी). देवेंद्र फडणवीस हे परिपक्व आहेत. ज्या वेळेस ते पुस्तक लिहतील त्यावेळेसच कळेल की नेमकं काय झालं, असं त्यांनी सांगितलं.

bjp chandrakant patil on devendra fadnvis ajit pawar morning oath ceremony bypoll election
Mohsin Shaikh Murder Row : 'सरकारने सोयीचे आरोपी शोधले होते'; निर्दोष मुक्ततेनंतर देसाईंची पहिली प्रतिक्रिया

निवडणुकीची पुर्वतयारी झाली..

चंद्रकांत पाटलांनी निवडणूकीबद्दल बोलताना सांगितले की, कसबा विधानसभा पोटनिवडणूक आधी २७ फेब्रुवारी रोजी होणार होती. पण त्यानंतर रविवारी २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणूकीची पूर्वतयारी सुरुवात झाली आहे.

नगरसेवक यांच्याकडे मी जाऊन आलो आहे.आज आम्ही कार्यकर्त्यांची बैठक बोलावली पण ती बैठक न होता महाबैठक झाली. संघटना म्हणून व्युव्हरचना पूर्ण झाली. एक शक्ती केंद्र तयार करणार एक केंद्र एका नगरसेवकाला दिले जाईल असेही पाटील यावेळी म्हणाले.

चिंचवड पोटनिवडणूक साठी महेश लांडगे राजकीय रणनीतीसाठी गेले आहेत. कसबा पेठमध्ये माधुरी ताई आहेत. हे दोघे ही सगळ्यांना भेटून इतर सगळ्या पक्षांना भेटतील. माधुरी ताई तर मुरलेल्या राजकारणी आहेत असे पाटील म्हणाले.

bjp chandrakant patil on devendra fadnvis ajit pawar morning oath ceremony bypoll election
Kasba Bypoll : कसब्यात भाजप 'या' पाचपैकी एकाला देणार संधी; केंद्रीय समितीकडे पाठवला प्रस्ताव

या दिवशी होणार उमेदवार जाहीर

आज इच्छुकांचा एक फॉर्म्याट प्रदेशाध्यक्षांकडे गेला आहे. त्यानंतर आता अध्यक्ष बैठक घेतली जाईल. तिघांची लिस्ट दिल्लीकडे पाठवली जाईल आणि त्यानंतर १, २ तारखेला उमेदवार जाहीर होऊ शकतो असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()