BJP Office : भाजपचे शहर कार्यालय नव्या वास्तूत; रविवारी स्नेहमेळावा

पुणे महापालिकेच्या शेजारी असलेल्या इमारतीमधील कार्यालयाची जागा सोडून आता भाजपने शहर कार्यालय म्हात्रे पुलाजवळ डीपी रस्त्यावर स्थलांतरित केले आहे.
 BJP
BJPesakal
Updated on

पुणे - पुणे महापालिकेच्या शेजारी असलेल्या इमारतीमधील कार्यालयाची जागा सोडून आता भाजपने शहर कार्यालय म्हात्रे पुलाजवळ डीपी रस्त्यावर स्थलांतरित केले आहे. गेल्या सहा वर्षात तिसऱ्यांदा शहर कार्यालय स्थलांतरित झाले आहे.

दरम्यान या नव्या कार्यालयात प्रवेश केल्याच्या निमित्ताने रविवारी (ता. ७) दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत स्नेहमेळावा आयोजित केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आदी क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली. सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, सुभाष जंगले, राहुल भांडारे, पुनीत जोशी, पार्थ मठकरी, संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले उपस्थित होते.

धीरज घाटे म्हणाले, ‘एक जानेवारी रोजी नव्या कार्यालयात आम्ही प्रवेश केला आहे. पुढील तीन वर्षासाठी या कार्यालयाचा भाडेकरार आहे. यामध्ये सभागृह, अध्यक्षीय दालन, कॉन्फरन्स रूम, वॉर रूमची व्यवस्था केली आहे. वर्तमान युगात माहितीचे आदान-प्रदान सुलभ व्हावे, प्रभावी जनसंपर्क करता या उद्देशाने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आली आहे.

सहा वर्षात तिसरे कार्यालय

१९८३च्या आधीपासून भाजपचे अनेक वर्षापासून पक्ष कार्यालय हे ग्रामदेवता तांबडी जोगेश्‍वरी मंदिराच्या शेजारील वाड्यात होते. २०१७ मध्ये भाजपची महापालिकेत सत्ता आल्यानंतर मोठ्या कार्यालयाची गरज भासू लागल्याने जंगली महाराज रस्‍त्यावर सन्मान हॉटेल येथे कार्यालय स्थलांतरित झाले.

डिसेंबर २०२१ मध्ये ही जागा भाजपने सोडली, तेथून मंगला थिएटरच्या शेजारील इमारतीमध्ये कार्यालय स्थलांतरित केले. त्यानंतर अवघ्या दोन वर्षात हीपण जागा सोडून देऊन कार्यालय डीपी रस्त्यावर स्थलांतरित केले.

‘डीपी रस्त्यावर भाजपचे कायमस्वरूपी कार्यालय करण्यासाठी आम्ही जागा खरेदीची प्रक्रिया सुरु केली आहे. तो व्यवहार झाल्यानंतर पुढच्या दोन वर्षाचा पक्ष कार्यालयाची नवीन इमारत उभी राहील.’

- धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप

धंगेकर टेंपररी आमदार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कसबा विधानसभेप्रमाणे पुणे लोकसभेचीही निवडणूक जिंकणार असा दावा पुण्यात बोलताना केला. त्यावर धीरज घाटे यांनी उत्तर देत काँग्रेसवर टीका केली. ‘कसबा पोटनिवडणुकीत निवडून आलेले रवींद्र धंगेकर हे टेंपररी आमदार आहेत.

पुणे लोकसभा आम्ही जिंकून पण कसबा विधानसभा जिंकल्याशिवाय भाजपचा कार्यकर्ता शांत बसणार नाही. आगामी निवडणुकीत आठही आमदार भाजपचे असतील,’ असे घाटे म्हणाले.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.