पुणे महापालिकेपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. केंद्रात व राज्यात मंत्री, राज्यसभेत खासदार अशा बलवंत नेत्यांची मोठी फळी उपलब्ध असताना भाजपच्या बालेकिल्ल्याला धक्का देण्याची हिंमत कोण दाखवणार, तशी धमक कोणात आहे, असे आव्हानच भाजपवाले विरोधकांना देताना दिसतात. मात्र हा अतिआत्मविश्वासच घात करू शकतो. म्हणून वरिष्ठ नेतृत्व सावध आहे.