Pune Bypoll Election : पाठिंबा असला तरी भाजपकडून मनसेची मनधरणी; काय आहे कारण?

राज ठाकरे यांची तोफ कसबापेठ, चिंचवडमध्ये धडधडणार?
Raj Thackrey
Raj ThackreyEsakal
Updated on

Kasba Chinchwad By Election : पुण्यातील चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी मनसेनं आपली भूमिका जाहीर केली आहे.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राजकारण तापलं असताना मनसेनं (MNS) तटस्थ भूमिका स्वीकारली होती. मात्र, आता मनसेनं आपले पत्ते खोलले असून दोन्ही ठिकाणी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे भाजपला पाठिंबा देणार आहे. मात्र, प्रचारात सहभागी होणार नाही, असं मनसे नेते बाबू वागस्कर यांनी सांगितलं होतं.

Raj Thackrey
Thackeray Vs Shinde : शिंदे गटाला धक्का! सरन्यायाधीशांनी युक्तिवादातील काढली हवा

दरम्यान राज ठाकरे यांनी दोन्ही मतदारसंघात सभा घ्याव्यात म्हणून भाजपने प्रयत्न सुरू केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज ठाकरे यांना सभा घेण्यासाठी गळ घालणार असल्याची माहीती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच दिली आहे.

Raj Thackrey
Thackeray Vs Shinde : "बंडामुळे नाही तर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे सरकार पडलं"

ते बोलताना म्हणाले की, कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध करावी म्हणून आम्ही महाविकास आघाडीला विनंती केली होती. राज ठाकरे यांनाही विनंती केली होती. महाविकास आघाडीने आमची विनंती मान्य केली नाही. पण राज ठाकरे यांनी आमची विनंती मान्य केली.

Raj Thackrey
Thackeray Vs Shinde : "बंडामुळे नाही तर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे सरकार पडलं"

राज ठाकरे यांनी कसबा आणि चिंचवडची निवडणूकीच्या प्रचारात सहभागी व्हावे म्हणून आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. ते येत नसतील तर त्यांचा प्रतिनिधी तरी प्रचारासाठी देण्यात यावा अशी विनंती आम्ही त्यांना करू, असं यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.