Video : 'दार उघड उद्धवा, दार उघड', भर पावसात भाजपने घातला गोंधळ

bjp
bjp
Updated on

पुणे - राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन कमी केला असला तरी अद्याप धार्मिक स्थळांना टाळे लावलेले आहेच. मंदिरे उघडून भाविकांना दर्शन घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी भर पावसात शहर भाजपतर्फे सारसबाग येथे आंदोलन करत "दार उघड उद्धवा दार उघड म्हणत संबळ अन टाळ वाजवून गोंधळ घातला. तसेच शहरात विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले. शहर भाजपतर्फे सारसबाग गणेश मंदिरा बाहेर शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे,आमदार सुनील कांबळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे आदी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. 

मंदिरे व धार्मिक स्थळे उघडावीत, सरकारला जाग यावी, डोळे उघडावेत  यासाठी घंटानाद करताना घोषणाबाजी करण्यात आली. शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, " पुण्यातील प्रमुख आंदोलन सारसबाग येथे झाले असले तरी शहरात जवळपास २०० ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे. लाॅकडाऊन मधून सर्व आस्थापन, माॅल, जीम सुरू झालेले असताना धार्मिक स्थळ मात्र बंद आहेत. राज्य सरकारने त्वरीत मंदिरे दर्शनासाठी खुले करावीत याकडे लक्ष वेधले आहे. आंदोलन करताना " दार उघडा उद्धवा दार उघड... असे म्हणत गोंधळ घालण्यात आला.

मुरलीधर मोहोळ, मुळीक यांनी टाळ वाजवून यात सहभाग घेतला. यावेळी "देवा या सरकारला सद्बुद्धी दे" अशी घोषणाबाजी करण्यात आली. खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत ओंकारेश्वर मंदिर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी बापट म्हणाले, "राज्य सरकारने जीम, माॅल, दुकाने उघडण्यास परवानगी दिली. दारूची दुकानेही सुरू केली. मात्र, मंदिर बंद आहेत. आपल्याला कोरोनाशी घाबरून जमणार नाही, सावधगिरीने समोर गेले पाहिजे. मंदिरांत दर्शन घेतल्याने माणूस आनंदी रहातो, मन स्थिर रहाते, अध्यात्मिक शक्ती मिळते असे आम्ही मानतो, त्यामुळे मंदिरे सुरू झाली पाहिजेत. यासाठी सरकारने लवकर नियमावली तयार करून धार्मिक स्थळे खुली करावीत. अन्यथा आम्हाला मंदिर सत्याग्रह करावे लागेल, असा इशारा ही बापट यांनी दिला.

उपनगरांतही आंदोलन...
कोथरुड : प्रार्थना स्थळे चालू करण्यासाठी आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. एरंडवणा येथील महादेव मंदिर, सुतारदरा येथील दक्षिणमुखी मारुती मंदिर आदी ठिकाणी आंदोलन करण्यात आले. एरंडवणा येथे नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, राजेंद्र येडे, शंतनू खिलारे पाटील, बाळासाहेब धनवे, श्रीकांत गावडे, कुणाल तोंडे, रामदास गावडे, नारायण वायदंडे उपस्थित होते.

सुतारदरा येथे  माजी नगरसेवक  दिलीप उंबरकर, पुणे शहर भाजपा चिटणीस निलेश कोंढाळकर, दत्ताभाऊ भगत, वैभव मारणे, कमलाकर भोंडे, अमर वाघमारे, शैलेश कोंढाळकर, संतोष रायरीकर सहभागी झाले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


विश्रांतवाडी : 'मंदिर व धार्मिक स्थळ खुले करा' या मागणीसाठी येरवड्यात घंटानाद आंदोलन करण्यात आले. येरवड्यातील काळभैरवनाथ मंदिर, दक्षिणमुखी श्री गणेश मंदिर, जैन मंदिर, हनुमान मंदिर, शिवशंकर मंदिर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी फिजिकल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करून आंदोलन केले. 
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनात शहर उपाध्यक्ष संतोष राजगुरू व माजी नगरसेवक किशोर विटकर, प्रताप मोहिते, रमेश गव्हाणे, गणेश ढोकले, किशोर वाघमारे, हेमंत परदेशी, सदाशिव फलके, विकास घोडके, अमोल तारू, अनिल झेंडे, गणपत पुरोहित, सागरसिंग बावरी,विकास भिंगारदिवे, शाम नाईक, प्रशांत नाणेकर, सुभाष देवकर, रितेश गायकवाड, रवींद्र राजगुरू यांनी सहभाग नोंदविला.

सहकारनगर : सातारा रस्ता, सहकारनगर परिसरातील साईबाबा मंदिर, शनी मंदिर, शंकर महाराज मठ, स्वामी समर्थ मंदीर, पर्वती गाव पायथा, शंकर मंदिर याठिकाणी भाजपतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले. 

यावेळी भाजपा झोपडपट्टी आघाडी पुणे शहरचे अध्यक्ष जीवन माने, नगरसेवक रघुनाथ गौडा, सरचिटणीस गणेश शेरला, किरण वैष्णव, अमित शहा, विकी मोरे, नितिन जमादार, गणेश कांबळे, महेश सांळुके इ. सहभाग नोंदवला. यावेळी उध्दव ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.