BJP Agitation : कर्नाटक सरकार विरोधात पुण्यात भाजपचे आंदोलन

कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या विरोधात आज भाजपतर्फे पुणे शहर कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले.
BJP Agitation
BJP AgitationSakal
Updated on

पुणे - कर्नाटकातील काँग्रेस सरकारने शालेय अभ्यासक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळिराम हेडगेवार धडे काढून टाकल्याने त्याविरोधात आज भाजपतर्फे शहर कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले.

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर, विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी, प्रमोद कोंढरे आदी उपस्थित होते.

BJP Agitation
Pune Court : वडिलांना लाभला चार वर्षांनंतर मुलांचा सहवास; न्यायालयाच्या आदेशानंतर मिळाला ताबा

कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी यावेळी भाजपतर्फे घोषणाबाजी करण्यात आली. मुळीक म्हणाले, सावरकर आणि हेडगेवार हे आमचे दैवत आहेत, त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही केवळ राहुल गांधींना खूष करण्यासाठी कर्नाटक सरकारने या महापुरुषांचे धडे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. आता उद्धव ठाकरे, संजय राऊत हे काय भूमिका घेणार हे स्पष्ट करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.