नारायण राणेंच्या अटके निषेधार्थ पुण्यात भाजपचे तीव्र पडसाद

केंद्रीय मंत्री झाल्यानंतर नारायण राणे यांनी जनआशिर्वाद यात्रा सुरू केली आहे. त्यामध्ये त्यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्य विधान केले.
BJP Agitation
BJP AgitationSakal
Updated on

पुणे - केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अटक (Arrest) केल्याच्या विरोधात पुणे भाजपमध्ये (BJP) याचे तीव्र पडसाद (Reaction) उमटले. शहरातील भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बालगंधर्व चौक येथे आंदोलन (Agitation) करून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचा निषेध केला.

केंद्रीय मंत्री झाल्यानंतर नारायण राणे यांनी जनआशिर्वाद यात्रा सुरू केली आहे. त्यामध्ये त्यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्य विधान केले. याप्रकरणी राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले. राणे यांना अटक केल्याने भाजपने राज्यभर आंदोलन केले. पुण्यात भाजपने जंगली महाराज रस्त्यावर बालगंधर्व रंगमंदिर येथे अटकेच्या निषेधार्थ आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.

BJP Agitation
गेल्या महिनाभरात एकदाही पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश उपाध्यक्षा वर्षा तापकीर, शहर सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष नगरसेवक राजेश येनपुरे, बापू मानकर, अर्चना पाटील आदी यावेळी उपस्थित होते. भाजपच्या यात्रेला जनतेचा पाठिंबा मिळत असल्याने महाविकास आघाडीने सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप यावेळी मुळीक यांनी केला.

मांजराला पाजले दूध

भाजप कार्यालयात शिवसैनिकांनी कोंबड्या सोडल्याने त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पुलाची वाडी येथील शिवसेना भवन येथे मांजराला दूध पाजून घरात लपून बसणाऱ्या शिवसैनिकांचे करायचे काय?... अशा घोषणा देत व मुख्यमंत्र्यांचा निषेध करत आंदोलन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.