लोहार समाज आर्थिक दृष्ट्या अजून ही हतबल

लोहारचे पारंपारिक हत्यार छिन्नी, हातोडी, घन ,ऐरण ,भाता ,भट्टी
blacksmith community
blacksmith communitysakal
Updated on

रामवाडी : पुण्यातील शहरी भागा सह आजूबाजूच्या उपनगर भागात आपला पारंपरिक व्यवसाय जोपासत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा अतिशय कष्टाळू लोहार समाज आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या आज ही मागासलेला आहे. गणेशनगर जुना मुंढवा रोड वडगावशेरी येथे राहणारे गंगाराम पवार मूळचे अहमदनगर भागातले यांनी त्यांचा पारंपरिक व्यवसाय जोपासला आहे. (blacksmith community is still financially weak)

blacksmith community
NEP नुसार शिक्षक घडविणारी देशातील पहिली संस्था पुण्यात!

उपनगर भागात आज ही शेतीची, बागकामाचे अवजारे बनविणे, विळे, कोयते, टिकाव -पहारी , प्राण्यांच्या खुरांची नाळ, कुदळी, घमेली खिडक्यांचे गज या वस्तू आज ही मागणी आहे.बारा बलुतेदार पैकी लोखंडाच्या वस्तू घडविणारे कारागीर म्हणजे लोहार आहे. तप्त लोखंडाला ऐरणीवर ठोकून वस्तूंना आकार देण्याचे काम तो करीत असतो. साधारण पणे शेतीची , बागकामाचे अवजारे बनविणे ,विळे कोयते, प्राण्यांच्या खुरांची नाळ, कुदळी, घमेली खिडक्यांचे गज या वस्तू बनवले जातात.(blacksmith is a craftsman who makes iron objects)

blacksmith community
सांगली : ॲपेक्स चौकशीप्रकरणी महापालिकेचे घूमजाव

लोहारा कडे छिन्नी, हातोडी, घन ,

ऐरण ,भाता ,भट्टी हे लोहारचे पारंपारिक हत्यार अवजारे त्यांच्या कडे असतात.भट्टीत तापलेल्या लालसर झालेल्या लोखंडी, पोलादी वस्तूंना ऐरणी वर ठोकून त्याला आकार देतो. दिवसभर तापलेल्या भट्टीतील रसरशीत निखारा जवळ बसुन काम करून थोडेफार पैसे मिळतात त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू असतात या कामात पवार यांना त्यांची पुतणी मदत करते. गंगाराम पवार म्हणाले दिवसभरात पाचशे ते आठशे रुपये मिळतात. या मध्ये घरभाडे ,अन्न धान्य, मुलांचे शिक्षण दवाखाना, सर्व खर्च भागवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सरकार कडून आमच्या समाजातील बांधवांसाठी मूलभूत सुविधा मिळाव्यात असे मला वाटते.(government should provide basic facilities to the brothers in our society)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.