पुण्यात माणुसकीला काळीमा! बिलासाठी चिमुकल्याचा मृतदेह 4 दिवस रुग्णालयातच

उपचार सुरू असताना पाच मे रोजी सायंकाळी बाळाचा मृत्यू झाला. रुग्णालयाने बाळाच्या उपचारासाठी चार लाख रुपये बिल आकारले होते.
Baby
BabyGoogle file photo
Updated on
Summary

उपचार सुरू असताना पाच मे रोजी सायंकाळी बाळाचा मृत्यू झाला. रुग्णालयाने बाळाच्या उपचारासाठी चार लाख रुपये बिल आकारले होते.

रामवाडी (पुणे) : कोरोनाच्या संकटात अनेकजण आर्थिकदृष्ट्या हतबल झाले आहे. रुग्णालयाचे बिल न भरल्याने अवघ्या सोळा दिवसांच्या बाळाचा मृतदेह तीन दिवस ठेवून घेतला. अखेर नातेवाईकांच्या मदतीला मनसे कार्यकर्ते धावून आले. त्या खाजगी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारल्यानंतर बाळाचा मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात चौथ्या दिवशी देण्यात आला. (body of little baby was kept for three days due to non-payment of hospital bills)

Baby
CM ठाकरेंच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, एकजण पोलिसांच्या ताब्यात

चंदननगर - संघर्ष चौक येथील गरोदर महिलेला कोरोनाची लागण झाल्याने पंधरा एप्रिलला शास्त्रीनगर येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. आठव्या महिन्यातच प्रसूती करण्यात आली, परंतु बाळाला जंतुसंसर्ग झाल्यामुळे 'एनआयसीयू'मध्ये ठेवण्यात आले. पाच लाख रुपये भरल्यानंतर दोन मे रोजी त्या महिलेला घरी सोडण्यात आले, पण बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर उपचारासाठी रुग्णालयात दोन लाख दहा हजार रुपये भरण्यात आले. उपचार सुरू असताना अखेर पाच मे रोजी सायंकाळी बाळाचा मृत्यू झाला. रुग्णालयाने बाळाच्या उपचारासाठी चार लाख रुपये बिल आकारले होते.

Baby
पुणेकरांनो सकाळी 11 नंतर घराबाहेर पडू नका, अन्यथा

कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. घरातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली होती. त्यात रुग्णालयात भरण्यासाठी त्यांच्याकडे चार लाख रुपये नव्हते. सध्या 50 हजार रुपये भरतो, अंत्यविधीसाठी बाळाचा मृतदेह देण्याची विनंती रुग्णालय प्रशासनाला करूनही बिल भरल्यानंतर बाळाचा मृतदेह ताब्यात दिला जाईल, असे सांगण्यात आले होते.

बाळाच्या वडिलांनी संध्याकाळी सात मे रोजी मनसेचे प्रभाग क्रमांक तीनचे अध्यक्ष मनोज ठोकळ यांना रुग्णालयात झाल्या प्रकारची संपूर्ण माहिती दिली. दुसर्‍या दिवशी मनसे विभाग अध्यक्ष सुनिल कदम, मनोज ठोकळ, चेतन मोरे, जय जगताप, मंजुनाथ वाल्हेकर, कैलास पोडमल, राहुल मोहिते सदर ठिकाणी जाऊन रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली असता बिल न घेताच बाळाचा मृतदेह चौथ्या दिवशी बाळाच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला.

Baby
पान खाल्ल्यानं कोरोना होत नाही? जाणून घ्या सत्य

पाच तारखेला बाळ संध्याकाळी मृत्यू पावल्याचे सांगण्यात आले. पन्नास हजार रुपये सध्या भरतो, पण मृतदेह द्या, अशी रात्री अकरापर्यंत विनवण्या करीत होतो. बिल भरल्यानंतर मृतदेह दिला जाईल, असे रुग्णांलयाकडून सांगण्यात आले. कोरोनामुळे वडील वारले होते. त्यांचा दहावा तळेगाव-ढमढेरे येथे केला, त्याच दिवशी रात्री मनसे कार्यकर्त्यांना भेटून सर्व प्रकार सांगितला. दुसर्‍या दिवशी दुपारी दीड वाजता बाळाचा मृतदेह ताब्यात मिळाला. त्यानंतर अंत्यविधी करण्यात आला.

- बाळाचे वडील

प्रसंगांचे गांभीर्य लक्षात न घेता रुग्णालयाकडून बिलांसाठी अडवणूक केली जात आहे. अशा रुग्णालयावर प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जावी, अशी आमची मागणी आहे.

- मनोज ठोकळ, मनसे प्रभाग अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.