Pune News : हांडेवाडीतील महिलेचा मृतदेह पाण्याच्या टँकरमध्ये

घरांमधून निघून गेलेल्या महिलेचा मृतदेह पाण्याच्या टँकरमध्ये आढळून आल्याची घटना गुरुवारी (ता. २०) सकाळी उघडकीस आली. फुरसुंगी येथील पॉवर हाउसजवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला.
Pune News
Pune Newssakal
Updated on

पुणे : घरांमधून निघून गेलेल्या महिलेचा मृतदेह पाण्याच्या टँकरमध्ये आढळून आल्याची घटना गुरुवारी (ता. २०) सकाळी उघडकीस आली. फुरसुंगी येथील पॉवर हाउसजवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला. हा खून आहे की आत्महत्या, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. कौशल्या मुकेश चव्हाण (वय २५, रा. दुगडचाळ, जेएसपीएम कॉलेजजवळ, हांडेवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. कौशल्या हरवल्याची तक्रार कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

अधिक माहितीनुसार, पुरुषोत्तम नरेंद्र ससाणे (वय २७, रा. दुगडचाळ, हांडेवाडी) यांचा पाण्याच्या टँकरचा व्यवसाय आहे. बुधवारी (ता. १९) दिवसभर पुण्याच्या विविध भागात टँकरने पाणी पोहोचविल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी घराजवळ टँकर उभा केला. त्यानंतर ते घरी गेले. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी टँकर बाहेर काढला. त्यानंतर त्यांनी रामटेकडी येथे पाणी भरले. टँकर घेऊन ते फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ असलेल्या एका घरी पाणी पोहोचविण्यासाठी गेले होते.

तेथील टाकीत पाणी सोडत असताना पाणी बाहेर येत नव्हते. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला वॉल्व्ह तपासला. मात्र, पाणी येत नसल्याने त्यांनी पाइप काढून पाहिले असता, आतून साडी आल्याचे त्यांना दिसले. साडी कुठून आली, हे पाहण्यासाठी ते टँकरवर चढले असता, त्यांना पाण्यामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला.

याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना कळवली. हडपसर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

कौशल्या या कोणत्या कारणामुळे घरांमधून निघून गेल्या होत्या, याचा आम्ही शोध घेत आहे, तसेच हा खून आहे की आत्महत्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्याचा उलगडा होऊ शकतो.

- संतोष पांढरे,

वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.