Pune News: पुण्यात खळबळ! हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत आढळला बॉम्ब शेल

Pune News: पुण्यात हिंजवडी परिसरात बॉम्ब शेल आढळून आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. हिंजवडी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
Bomb shell- pune
Bomb shell- puneesakal
Updated on

बेलाजी पात्रे

Pune News: पिंपरी चिंचवड शहरालगतच्या आयटी पार्क हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मान-म्हाळुंगे रस्त्यातील ब्लोरिस सोसायटीच्या मागे बुधवारी (ता. ३) पीएमआरडीए प्रशासनाकडून पूल उभारण्याच्या कामासाठी जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोदकाम सुरू असताना बॉम्ब आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे हिंजवडीत बॉम्ब आढळण्याची ही तिसरी घटना ठरली आहे.

हा बॉम्ब पूर्णपणे गंजलेला असून त्याची लांबी एक फूट व ४० सेमी परीघ आहे. त्याचे वजन सुमारे आठ किलो आहे. त्या बॉम्बची पाहणी करण्यासाठी व तो जिवंत असल्यास त्याला डीफ्युज करण्यासाठी हिंजवडी पोलिसांनी बीडीडीएस पथकाला पाचरणे केले होते त्या पथकाने पाहणी करून तो बॉम्ब खड्ड्यात पुरून ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार पोलीस ठाण्याच्या शेजारील मोकळ्या मैदानात तीन बाय चार साईचा खड्डा करून त्याला सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

Bomb shell- pune
Fact Check: नरसिंह राव यांना 'भारतरत्न' प्रदान करताना मल्लिकार्जून खर्गे यांनी टाळ्या वाजवल्या नाहीत हा दावा खोटा

हा बॉम्ब हिंजवडी पोलीस लष्कराच्या सदर्न कमांडकडे सुपूर्द करण्यासाठी आवश्यक तो पत्रव्यवहार करणार आहेत. त्यापासून नागरिकांच्या जीवाला कोणताही धोका उद्भवू शकणार नाही असही हिंजवडी पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आल आहे. जुन्या काळी हिंजवडी पट्ट्यातील या भागात घनदाट जंगल व निर्जन भाग असल्याने ब्रिटिशांच्या काळात या भागात युद्धसराव केला जायचा त्यादरम्यान नीकामी न झालेले बॉम्ब जमिनीखाली गाढले गेले होते ते आता असे खोदकामे करताना आढळून येत आहेत, असेही काही जुन्या जाणत्या लोकांनी सकाळशी बोलताना सांगितले. (Pune Marathi News)

         
आम्ही बीडीडीएस पथकला पाचारण केले होते त्यांनी पाहणी केली आहे. त्यांच्या सूचनेनुसार तो बॉम्ब  पोलीस ठाण्याच्या बाजूच्या मोकळ्या मैदानात खड्डा खंदून सुरक्षित ठेवण्यात आला आहे.सदर्ण कमांड पत्राव्यावहार करून त्यांच्या सूचनेनुसार कारवाई केली जाईल.

- कन्हैया थोरात (वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी)

Bomb shell- pune
Ramdev Baba: कोविड उपचारावर खोट्या दाव्यांसाठी केंद्राने पतंजलीविरुद्ध कारवाई का केली नाही? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.