Pune Railway: पुण्यातून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांचं बुकिंग ‘फुल्ल’; दिवाळीसाठी प्रवाशांची लगबग

राज्याच्या इतर भागांसह परराज्यातील प्रवाशी गावाकडं जाण्यासाठी सज्ज
Railway
Railway
Updated on

पुणे : दिवाळीचा सण अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपल्यानं चाकरमान्यांची गावाकडं जाण्याची लगबग सुरु झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून रेल्वे गाड्यांचं बुकिंग फुल्ल झाले आहेत. पुण्यातून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांना १५० पेक्षा अधिक वेटींग असल्याचं दिसून येत आहे. (Booking of trains departing from Pune is full rush of passengers for Diwali Festival)

Railway
Girish Mahajan: गिरीश महाजनांचा विद्यार्थ्यांसोबत अर्वाच्च भाषेत संवाद? ऑडिओ क्लीप व्हायरल

पुण्यातून सुट्टीच्या कालावधीत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर भारतात जाण्यासाठी अनेक रेल्वे गाड्या सोडल्या जातात. दरम्यान, पुणे रेल्वे स्टेशनमधून दररोज अडीचशेपेक्षा जास्त गाड्या ये-जा करतात. त्यात आता दिवाळसणाच्या पार्श्वभूमीवर पुणे-नागपूर, पुणे-हजरत निजामुद्दीन (दिल्ली), पुणे-बिलासपूर यांसारख्या परराज्यात जाणाऱ्या अनेक गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.

गोरखपूर, दानापूर, दरभंगा, जबलपूर, इंदूर, हावडा या उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी देखील मोठं वेटिंग असल्याचं बुकिंग प्रणालीवर दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()