Bopdev Ghat Case Update: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील दुसरा आरोपी ताब्यात; पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक

बोपदेव घाटात कोयत्याचा धाक दाखवून अत्याचाराचा प्रकार घडल्यानं पुण्यात खळबळ उडाली होती.
bopdev ghat rape case accused
Bopdev ghat rape case accusedsakal
Updated on

Bopdev Ghat Case Update: पुण्यातील बोपदेव घाटात काही दिवसांपूर्वी एका २१ वर्षांच्या तरुणीवर झालेल्या सामुहिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यामधील दुसऱ्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथून अटक केली आहे.

bopdev ghat rape case accused
Gunaratn Sadavarte: बिगबॉसमध्ये गेलेल्या सदावर्तेंवर हायकोर्टाची नाराजी! त्यांना गांभीर्यच नसल्याचा ठेवला ठपका

पोलिसांच्या माहितीनुसार, बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील तीन आरोपींपैकी दुसऱ्या 25 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. तीन आरोपींपैकी आत्तापर्यंत २ आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्यापही फरार असून पुणे पोलिसांकडून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

bopdev ghat rape case accused
Congress Meeting: हरियानातील पराभवाचा नेत्यांना धसका! काँग्रेसच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; मराठा-ओबीसींबाबत घेतला मोठा निर्णय

दरम्यान, या प्रकरणातील पहिल्या आरोपीला ११ ऑक्टोबर रोजी अटक झाली होती. चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया (वय २०, डिंडोरी, मध्य प्रदेश) असं या आरोपीचं नाव आहे. यातील तिन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

bopdev ghat rape case accused
Eknath Shinde: काँग्रेस-राष्ट्रवादीला माहितीए 'त्यांचा' चेहरा चालणार नाही, मग महाराष्ट्राला कसा चालेल?; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी बोपदेव घाटात गुरुवारी (ता. ३) रात्री दहाच्या सुमारास मद्य प्राशन केले. त्यानंतर त्यांनी घाटात बसलेल्या तरुण-तरुणीला बांबूने मारहाण केली. कोयत्याच्या धाक दाखवून तिघांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी बोपदेव घाटातून दुचाकीवरून पसार झाले.

bopdev ghat rape case accused
Nitesh Rane: नितेश राणेंची अटक टळली! मुंबई हायकोर्टानं अजामीनपात्र वॉरंट केलं रद्द, पण...

त्यानंतर ते सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी परिसरात गेले. पोलिसांना चकवा देण्यासाठी मुख्य रस्त्याऐवजी अंतर्गत रस्त्यांचा वापर केला. सुमारे २० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ८० किलोमीटरचा प्रवास केला. सासवड परिसरात एका पेट्रोल पंपावरील चित्रीकरणात आरोपींचे चेहरे स्पष्ट आढळून आले होते. तसेच, एका मद्य विक्री दुकानात मद्य सेवन करीत असल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.