पुणे - बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आत्तापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे. तिसऱ्या फरार आरोपीलाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल. तसेच, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहर आणि परिसरातील टेकड्यांच्या परिसरात पोलिस गस्त वाढविण्यासह आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.