Bridge Hole : ब्रिटीश कालीन डिकसळ पुलाला भगदाड; वाहतुकीसाठी पुल बंद

पुणे व सोलापुर जिल्ह्यास जोडणाऱ्या ब्रिटीशकालीन डिकसळ(ता.इंदापुर) पुलाच्या कमानीचे शनिवारी(ता.14) काही दगड कोसळुन भगदाड पडल्यामुळे या भागांमध्ये एकच खळबळ उडाली.
Diskal Bridge hole
Diskal Bridge holesakal
Updated on
Summary

पुणे व सोलापुर जिल्ह्यास जोडणाऱ्या ब्रिटीशकालीन डिकसळ(ता.इंदापुर) पुलाच्या कमानीचे शनिवारी(ता.14) काही दगड कोसळुन भगदाड पडल्यामुळे या भागांमध्ये एकच खळबळ उडाली.

भिगवण - पुणे व सोलापुर जिल्ह्यास जोडणाऱ्या ब्रिटीशकालीन डिकसळ(ता.इंदापुर) पुलाच्या कमानीचे शनिवारी(ता.14) काही दगड कोसळुन भगदाड पडल्यामुळे या भागांमध्ये एकच खळबळ उडाली. पुलाच्या कमानीचे दग़ड पडल्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. खबरदारीचा उपाय म्हणुन प्रशासनाने तातडीने हा पुल वाहतुकीसाठी बंद केला आहे. प्रशासनाने याबाबत योग्य ती दखल घेण्याची आवश्यकता स्थानिक व प्रवाशांकडुन व्यक्त केली जात आहे.

पुणे व सोलापुर जिल्ह्यास जोडणारा डिकसळ(ता.इंदापुर) येथील रेल्वे पुल सुमारे दीडशे वर्षापुर्वीचा ब्रिटीशांनी बांधला आहे. उजनी धरणाच्या निर्मितीनंतर रेल्वेसाठी नव्याने पुल बांधण्यात आल्यामुळे सुरुवातीचा काही काळ हा पुल बंद होता. त्यानंतर हा पुल रस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या पुलावरुन करमाळा(जि. सोलापुर) मधील सुमारे वीस गावातील लोकांचा पुणे जिल्ह्याशी संपर्क प्रस्थापित झाला होता. जड वाहतुकीसाठीही हा पुल वापरला जावु लागल्यामुळे मागील काही दिवसांमध्ये सातत्याने पुलाचे नुकसान होत होते.

जड वाहतुकीसाठी धोकादायक असल्यामुळे हा पुल अनेकदा जड वाहतुकीस बंदी करण्यात आला होता. बंदी असतानाही येथे जड वाहतुक सुरु असल्यामुळे पुल धोकादायक बनला होता. शनिवारी(ता.14) पहाटेच्या सुमारास काही जड वाहने पुलावरुन गेल्यामुळे पुलाच्या कामानीचे काही घडीव दगड कोसळले. सध्या पुलाच्या बरोबरीने पाणी असल्यामुळे लाटांमुळे आणखी दगड कोसळण्याची शक्यता आहे. या पुलावरुन चोवीस तास दुचाकी-चार चाकी व इतरही वाहने जात असतात. रात्रीच्या वेळी वाहतुकीस हा पुल प्रचंड धोकादायक बनला आहे. त्यामुळे या ठिकाणी धोका टाळण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

जड वाहतुक बंदीच्या शासनाच्या निर्णयाला हरताळ

पुलाची नाजुक अवस्था व अनेकदा झालेली पडझड विचारात घेऊऩ शासनाने अनेकदा या पुलावरुन जड वाहतुकीस बंदी घातली होती. बंदी घातल्यानंतर बंदीच्या निर्णयाला हरताळ फासत पुलावरुन जड वाहतुक केली जात होती. जड वाहतुकीमुळे आधीच कमकुवत झालेला पुल आणखी कमकुवत बनला असुन वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. सध्या येथे नवीन पुलास मंजुरी मिळाली आहे नवीन पुल होईपर्यंत येथील वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता स्थानिकांकडुन व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.