पिंपरी : आपल्या काळात बेस्ट केलेले पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या राजवटीत वेस्ट सिटी झाल्याचा आरोप करत ती पुन्हा क्लीन करण्याचा निश्चय विरोधी बाकावर असूनही राष्ट्रवादीने केला आहे. त्यासाठी दर रविवारी ते एकेका प्रभागात स्वच्छता मोहीम राबविणार आहे.त्याचा श्रीगणेशा आज पक्षाचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आला. कचरा प्रश्नावरूनच राष्ट्रवादीसह आपल्याही नगरसेवकांकडूनही कोंडी होण्याची भीती वाटल्याने परवाची (ता.20) पालिका सभा सत्ताधारी भाजपने तहकूब केली होती.

राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी स्वत: हातात झाडू घेऊन या स्वच्छता मोहिमेची सुरवात केली. रविवारी शहराच्या मुख्य भाजी मंडईत मोठी वर्दळ असल्याने तेथे आजच ती घेण्यात आली. पुढील पंधरा दिवसांत शहरातील कचऱ्याची समस्या समस्या ही सुटलीच पाहिजे, शहर कचरा आणि दुर्गंधीमुक्त झालेच पाहिजे असे पार्थ यांनी यावेळी सांगितले.
नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, राजू मिसाळ, प्रवक्ते फजल शेख, नगरसेविका उषा वाघेरे पाटील, निकिता कदम, गणेश भोंडवे, मा. नगरसेवक शेखर ओव्हाळ, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे आदी या मोहिमेत सहभागी झाले होते. आता पुढील रविवारपासून एकेका प्रभागात ती घेतली जाणार आहे, त्यात पक्षाचे सर्व सेल सहभागी होतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील आणि प्रवक्ते व सरचिटणीस फजल शेख यांनी हे अभियान संपल्यानंतर सरकारनामाला दिली.त्यामुळे आठ महिन्यानंतर शहराचा चेहरामोहरा थोडातरी बदलेलेला दिसेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. अजितदादांमुळे शहर बेस्ट झाले होते.मात्र,भाजप सत्तेवर येताच ते वेस्ट सिटी झाल्याने ते पुन्हा बेस्ट व स्वच्छ करण्याचा निश्चय आमच्या नेत्याच्या (अजित पवार) वाढदिवसापासून केला आहे, असे शेख म्हणाले.
स्वच्छता अभियानानंतर पार्थ व शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. एकेकाळी बेस्ट सिटीने सन्मानीत झालेल्या शहराचा स्वच्छेतच्या बाबतीत जर ५२ वा क्रमांक जात असेल, तर ही गंभीर बाब आहे, असे पार्थ यावेळी म्हणाले. सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार चालू आहे, अस मत त्यांनी मांडले. संपूर्ण शहरात दररोज स्वच्छता झालीच पाहिजे, असे आयुक्तांना सांगण्यात आले. कचरा संकलित करणाऱ्या नवीन गाड्याची उंची जास्त असल्यामुळे त्यांची उंची कमी करण्यात यावी, जेणेकरून महिलांना कचरा टाकण्यास अडचण येणार नाही,अशी सुचनाही त्यांना केली गेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.