शंभरी ओलांडलेल्या भाऊ- बहिणीचे खापर पतवंडांच्या साक्षीने रक्षाबंधन   

parinche
parinche
Updated on

परिंचे (पुणे) : पुरंदर तालुक्यातील सटलवाडी येथे शतकवीर भाऊ- बहिणीच्या रंगलेल्या रक्षाबंधनाचे विशेष कौतुक होत आहे. जमीन अन्‌ तत्सम प्रकरणावरून भाऊ बहिणीच्या नात्यात अनेकदा दरी निर्माण होते. त्या पार्श्‍वभूमीवर शतक पार केलेल्या या भाऊ बहिणीचे अतूट नाते आधुनिक व स्वार्थी जगासाठी दिशादर्शक ठरत आहे.


सटलवाडी येथील गजानन गणपत कदम (वय 101) यांची बहिण अनसूया ज्ञानोबा गायकवाड (वय 103) या दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील आहेत. या शतकवीर भाऊबहिणीचे एकमेकांचे नाते अतूट आहे. दोघांनीही अनेक वर्ष पंढरपूरची पायी वारी केली आहे. विशेष म्हणजे या दोघांनीही आपल्या कुटुंबातील खापर पतवंडांनाही अंगाखांद्यावर खेळविले आहे. अनसूया गायकवाड यांना 9 मुली व 2 मुलगे, तर, गजानन कदम यांना 6 मुली व 2 मुले आहेत. दोघांच्याही कुटुंबात शंभराहून अधिक व्यक्तींचा समावेश आहे. मात्र, तरीही दोघांच्याही घरी एकत्र कुटुंब पद्धती आहे, हे विशेष.

राष्ट्रवादीच्या आमदाराकडून सरकारला घरचा आहेर... 
 
या भाऊ-बहिणीच्या अतूट बंधनाबद्दल गजानन कदम यांचा मुलगा गोपाळ कदम यांनी सांगितले की, पूर्वी गाड्यांची सुविधा नसताना आमचे वडील परिंचे गावावरून दौंडला सायकलवरून जात होते. रक्षाबंधनाला आमच्या आत्या दौंडवरून चालत परिंचे गावाला येत असे. या भाऊबहिणीचे प्रेम पाहून आमच्या कुटुंबातील भाऊ बहिणींमध्ये असाच जिव्हाळा असून, राखी पौर्णिमा व भाऊबीज आम्हीही मोठ्या उत्साहात साजरी करतो. 

दोघांनाही शेतीची आवड आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही मुलाला नोकरीला न लावता शेती करण्याचा आग्रह केला होता. आज त्यांची मुले परिसरात प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखली जातात. अनेक ठिकाणी जमिनीवरून भाऊ बहिणीचे वाद पाहायला मिळतात. अशा काळात अनसूया व गजानन या शतकवीर भाऊ बहिणीचे प्रेम समाजाला दिशा दर्शक असून, हे अतूट नाते आधुनिक युगात खूप गोष्टी शिकवून जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.