Vadgaon Sheri News : बीआरटी मार्ग हटवला! पुण्यातील आणखी एक सदोष प्रकल्प गुंडाळण्याची प्रशासनावर नामुष्की

नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गापैकी विमाननगर चौक ते सोमनाथनगर चौक हा तीनशे मीटर अंतराचा मार्ग पुणे महानगरपालिका प्रशासनाने रात्री जेसीबी लावून हटवला.
BRT Route Remove
BRT Route Removesakal
Updated on

वडगाव शेरी - नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गापैकी विमाननगर चौक ते सोमनाथनगर चौक हा तीनशे मीटर अंतराचा मार्ग पुणे महानगरपालिका प्रशासनाने रात्री जेसीबी लावून हटवला. वाहतूक कोंडीतून सुटका होईल असे कारण देत येरवडा ते विमाननगर चौक हा मार्ग दहा महिन्यांपूर्वीच हटवण्यात आला होता. आता नगर रस्त्यावर आठ किलोमीटर पैकी फक्त तीन किलोमीटरचा बीआरटी मार्ग शिल्लक राहिला आहे.

नगर रस्त्यावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी चे कारण देत या मार्गावरील बीआरटी हटवा अशी मागणी गेल्या दोन वर्षांपासून राजकीय पदाधिकाऱ्यांनी लावून धरली होती. रोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मार्गाकडे पुणे महानगरपालिकेचे आणि पीएमपीएलचे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक वेळा या मार्गावर टीका होत होती. शिवाय बीआरटी प्रकल्पाच्या सदोष अंमलबजावणीमुळे अपघात होत होते.

बीआरटी मार्गातील दोष दूर करण्याऐवजी पुणे महानगरपालिकेने गोखले इन्स्टिट्यूट कडून अहवाल मागवला आणि त्या आधारे 2023 च्या डिसेंबर महिन्यात येरवडा ते विमान नगर चौक वीआरटी हटवली. त्यानंतर विमान नगर चौक ते सोमनाथ नगर फाटा ही तीनशे मीटरची बी आर टी हटवण्याची मागणी स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांच्यासहित अनेक पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार पुणे महानगरपालिकेने वाहतूक पोलिसांकडून अहवाल मागवला आणि मंगळवारी रात्री जेसीबी लावून बीआरटी हटवली.

प्रतिक्रिया

आमदार सुनील टिंगरे -

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बीआरटी हटवा अशी मागणी मी विधिमंडळात आणि त्यानंतर पुणे महानगरपालिकेकडे केली होती. बीआरटी हटवण्याबाबत गोखले इन्स्टिट्यूट चा अभिप्राय आल्यानंतर त्याचा पाठपुरावा केल्यामुळे बीआरटी काढण्यात आली. आता उर्वरित बीआरटी मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

छाया लवांडे (बस प्रवासी - खांदवेनगर) -

बीआरटीमुळे जलद प्रवास होत होता. तसे पहाता बस साठी स्वतंत्र मार्ग पाहिजे. आता बस सुद्धा वाहतूक कोंडीत अडकेल.

दिवांश शहा (बस प्रवासी विद्यार्थी वाघोली) -

बीआरटी काढली तरी वाहतूक कोंडी होणारच. याचा जास्त फरक पडणार नाही. उलट बससाठी स्वतंत्र मार्ग असणे गरजेचे आहे. आम्हाला वेळेवर कॉलेजला आणि घरी जाता येईल. त्यामुळे वेळ वाचतो.

सुरज क्षीरसागर (प्रवासी विद्यार्थी विमाननगर) -

बस थांब्याची पर्यायी व्यवस्था न करता बीआरटी बंद केल्यामुळे आता ऊन आणि पावसात उभे राहून बसची वाट पहावी लागत आहे. चुकीच्या नियोजनाचा त्रास आम्हाला होत आहे.

कनिज सुखरानी (माहिती अधिकार कार्यकर्त्या) -

सदोष बीआरटी असल्याने अपघात होत होते. अशी सदोष बीआरटी हटवण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत होते. योजना चांगली असली तरी त्याची अंमलबजावणी चुकीची झाली.

कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेल्या नगर रस्ता बीआरटीचे उद्घाटन तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले होते. आज अजित पवार पालकमंत्री आहेत. त्यांच्याच कार्यकाळात सदोष बीआरटी तोडण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. त्यामुळे जनतेचा कोट्यावधी कररूपी निधी आणखी एका चुकीच्या प्रकल्पामुळे पाण्यात गेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.