Kasba Bypoll : तिकडे प्रचाराचा धुरळा; इथं कसबेकरांची घरं फुटतायत!

कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही या घटना घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहेत.
Kasaba Bypoll
Kasaba BypollSakal
Updated on

कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्यासह अनेक मोठमोठे नेते आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पुण्यात शक्तिप्रदर्शन करत आहेत. मात्र दुसरीकडे जनता संकटात पडल्याचं चित्र आहे.

पोटनिवडणुकीच्या धामधुमीत कसबा मतदार संघात सहा ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाला आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना घडलेल्या या गुन्ह्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, सहा ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाला आहे. त्यापैकी दोन सदनिकांमध्ये जवळपास सात लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे.

चोरी गेलेल्या ऐवजामध्ये सोन्याचे दागिने आणि काही रोकड यांचा समावेश आहे. याबद्दल पीडित सतिश कामतकर यांनी तक्रार दिली आहे. या इमारतीच्या गेटवर ना सुरक्षारक्षक आहे, ना सीसीटीव्ही कॅमेरा. सहा घरं फोडण्यात आली. त्यापैकी दोन घरांतल्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत. इतर चार फ्लॅट्समध्ये काहीही सापडलं नाही. आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत, अशी प्रतिक्रिया या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी संतोष शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.