पुणे - आर्थिक व्यवहारात फसवणूक झाल्यामुळे एका व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. .रमजान अली साचे (वय ४४, रा. भवानी पेठ) असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी रमजान यांच्या पत्नीने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सुनील बेले, अफसर शेख, मतीन शेख, हैदर शेख, असिफ, मुजम्मिल पटवेकर, संजीव बजारमठ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमजान साचे यांचा कपड्यांचा व्यवसाय होता. त्यांना व्यवसायात गुंतवणूक केल्यास जास्त फायदा करून देतो, असे सांगून आरोपींनी मोठी रक्कम घेतली. रमजान यांनी बँकेतून कर्ज घेउन पैसे दिले होते. परंतु आरोपींनी पैसे परत केले नाहीत. त्यामुळे रमजान यांनी १४ ऑक्टोबर रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली..याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. रमजान यांच्या पत्नीने २१ ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी सातजणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक कुलदीप व्हटकर करीत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.