Pune News : कामाच्या अतिताणामुळे सीए तरुणीचा मृत्यू; आईने धरले कंपनीला जबाबदार

कामाच्या अतिताणामुळे सनदी लेखापाल (सीए) म्हणून एका आंतरराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्या आईने केला.
Crime
Crimesakal
Updated on

पुणे - कामाच्या अतिताणामुळे सनदी लेखापाल (सीए) म्हणून एका आंतरराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्या आईने केला आहे. ॲना सेबॅस्टियन (वय २६) असे या तरुणीचे नाव आहे. ती अर्न्सट ॲण्ड यंग (ईवाय) या कंपनीत कार्यरत होती.

कंपनीमध्ये रुजू झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यातच ॲना यांचा जुलै महिन्यात मृत्यू झाला आहे. त्यांच्या आई अनिता सेबॅस्टियन यांनी कंपनीवर गंभीर आरोप केल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. कंपनीतील वरिष्ठांनी तिला सातत्याने दिलेल्या अतिरिक्त कामाच्या ताणामुळे माझ्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.