पिंपळवंडी : जुन्नर तालुक्यातील (junnar) कुकडी नदीवरील वडगाव कांदळी गावच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल (electric pump cable) सोमवारी (ता. ३) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी (thef) चोरून नेल्या.(cable theft session continues in junnar).
वडगाव कांदळी येथील कुकडी नदीच्या बंधार्यावरून नगदवाडी, वडगाव कांदळी, साळवाडी याठिकाणी शेतीच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून उपसा जलसिंचन योजना राबविल्या आहेत. वडगाव कांदळी या बंधाऱ्यामधून ९० ते १०० शेतकऱ्यांनी आपल्या विद्युत मोटारी बसविल्या आहेत. सोमवारी (ता. ३) रात्री चोरट्यांनी २४ शेतकऱ्यांच्या अंदाजे अडीच ते तीन लाख रुपये किंमतीच्या कॉपर केबलची चोरी केली आहे अशी माहिती वडगाव कांदळीचे पोलिस पाटील बाळासाहेब पाचपुते यांनी दिली. रामदास निलख, निवृत्ती पाचपुते, संतोष शेळके, सचिन निलख, जावेद इनामदार, संभाजी पवार, शांताराम औटी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबलची चोरी झाली आहे.
चोरांनी केबल घटनास्थळावरून काही अंतरावर नेऊन त्याच्या बाहेरील प्लास्टिकचे आवरण काढुन त्यातील कॉपर घेऊन गेले आहे. जुन्नर तालुक्यात केबल चोरी ही नित्याचीच बाब झाली असून, नदीपात्रातील पाणी कमी झाले की, दरवर्षी विद्युत मोटारीची केबल चोरी होत असते. सुरुवातीला शेतकरी हा भुर्दंड सहन करून पोलिसात तक्रार करत नव्हते. परंतु हा प्रकार दिवसेंदिवस वाढत गेल्याने शेतकरीही पोलिसांत तक्रार दाखल करत आहेत. काही दिवसांपुर्वी जुन्नर तालुक्यात येडगाव येथील शेतकऱ्यांच्या विद्युत् पंपांच्या लाखो रुपयांच्या केबल चोरी गेल्या होत्या. तसेच चोरांची माहिती सांगणाऱ्यास शेतकऱ्यांनी बक्षीसही जाहीर केले होते. परिसरातील केबल चोरांना शोधणे हे नारायणगाव पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक बी. वाय. लोंढे पुढील तपास करत आहेत.
माझ्यासह २४ शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे अंदाजे अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाले असून, कोरोनाकाळ तसेच गारपिटीने शेतकरी त्रस्त असताना हि चोरी झाल्याने आम्ही अडचणीत आलो असून पोलिसांनी लवकरात लवकर चोरांचा शोध घ्यावा हि आमची मागणी आहे.
-सचिन निलख, सदस्य, वडगाव कांदळी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.