'मंकीपॉक्स' महामारीचं स्वरुप धारण करेल का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात?

सध्या युरोप आणि उत्तर अमेरिकेत या आजाराची अनेक प्रकरणं आढळून आली आहेत.
US Reported First Monkeypox Case
US Reported First Monkeypox Casee sakal
Updated on

पुणे : जगभरात सध्या वेगानं पसरत असलेला मंकीपॉक्स आजार हा कोविडप्रमाणं महामारीचं स्वरुप धारण करु शकतो का? यावर पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांनी मत मांडलं आहे. कोविडनं दोन वर्ष जगभरात ठाण मांडल्यानंतर युरोप आणि उत्तर अमेरिकेत आलेल्या या आजारानं काहीशी काळजी वाढवली आहे. (Can Monkeypox take form of an pandemic Find out what experts have to say)

पुण्यातील डॉ. ईश्वर गिलाडा म्हणाले, सध्याच्या घडीला कोणीही सांगू शकत नाही की मंकीपॉक्सचा विषाणू महामारीच रुप धारण करेल किंवा नाही. विशेषतः कोरोनाचा विषाणू जो एका छोट्या शहरातून जगभरात पसरला आणि दोन वर्षे ठाण मांडून बसला. पण यामुळं काळजी करण्याचं कारण नाही, यावर अभ्यास मात्र व्हायला हवा.

US Reported First Monkeypox Case
संभाजीराजेंचा राजकीय गेम करण्याचा प्रयत्न तर नाही ना? - दरेकर

मंकीपॉक्स हा झुनॉटिक प्रकारचा विषाणू आहे, जसं की HIV. एचआयव्हीचा विषाणू सुरुवातीला माकडांमध्ये आढळून आला. ज्याला सिमिअन इम्युनोडिफिसिअन्सी व्हायरस (SIV) असं संबोधलं जात आहे. अशा प्रकारचे विषाणू हा प्राण्यांमध्ये पसरतात त्यानंतर त्याचा मानवालाही संसर्ग होतो. गेल्या ४० वर्षात सर्व प्रकारचे संसर्ग हे पसरले आहेत. पण आपल्याकडे हा संसर्ग थोपणारे शक्तीशाली अँटिव्हायरस औषधं नव्हती. सध्या मंकीपॉक्स हा विषाणू म्युटेट होत आहे, असंही डॉ. गिलाडा यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()