Pune News : गर्भाशयावर शस्त्रक्रिया करून महिलेच्या शरीरातून काढली १३ किलोंची गाठ

कॅनडातून 'ती' आली उपचारांसाठी पुण्यात.
women Surgery
women Surgeryesakal
Updated on

पुणे - भारतीय वंशाच्या कॅनेडियन महिलेवर शस्त्रक्रिया करून १३ किलो वजनाची गाठ काढण्यात आली. त्याला वैद्यकीय परिभाषेत ‘नॉन कॅन्सर युटेराईन फायब्रॉइड’ असे म्हणतात. महिलेला रुग्णालयात आणले त्यावेळी सातत्याने होणारा रक्तस्राव, पाळीच्या वेळी दुखणे आणि पाठ पोटदुखी सारखी लक्षणे होती.

तपासणी केल्यानंतर असे आढळून आले की त्यांच्या गर्भाशयात फायब्रॉइड आहे, ही गाठ म्हणजे प्रसूतीच्या वेळी स्त्रीच्या पोटातील बाळा इतकी (३६ आठवड्यांच्या गरोदर काळा इतकी मोठी) होती.

गर्भाशयातील फायब्रॉइड्स म्हणजे बहुसंख्य वेळा कर्करोग नसलेल्या गाठी असतात. त्या गर्भाशयाच्या भिंती किंवा गर्भाशयात निर्माण होतात. याचा आकार वाढतो. मासिक रक्तस्त्रावात होणारी वाढ, ओटीपोटात दुखणे आणि पोटावर किंवा आतड्यावर दाब येणे अशी याची प्रमुख लक्षणे असतात.

वेळेत उपचार न केल्यास त्याचा आकार आणि संख्या वाढू लागते. प्रत्येक रुग्णामध्ये उपचारांचे विविध पर्याय असून ‘टोटल लॅप्रोस्कोपिक हिस्टेरेक्टोनॉमी’ ही किमान जखम करणारी पद्धत आहे, असे बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. बालाजी नलवाड यांनी सांगितले.

ते म्हणाले, 'महिला रुग्ण कॅनडात काही वैद्यकीय उपचार घेत होत्या पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. तिचे वजन हे ११५ किलो होते. रुग्णाचे तीन वेळा सिझेरियन केलेले असल्याने शस्त्रक्रियेच्या वेळी समस्या निर्माण होण्याचा धोका खूप मोठ्या प्रमाणावर होता. त्याच बरोबर हायपरथारॉडिझम, मधुमेह, हृदयाशी संबंधित समस्या आणि स्थूलता अशी विविध आव्हानेही होती.

तिच्या गर्भाशयात मोठ्या आकाराचा युट्राईन फायब्रॉइड असल्यामुळे आम्ही टोटल लॅप्रोस्कोपिक हिस्टेरेक्टोनॉमी करण्याचे ठरवले, यामध्ये ५ ते १० मिलिमीटर छिद्र पाडून कॅमेऱ्यासह विशेष उपकरणे वापरली जातात. अशा प्रक्रियांमध्ये परंपरागत ‘ओपन सर्जरी’च्या तुलनेत कमी धोका असतो.’

रुग्णाचा वैद्यकीय इतिहास आणि गाठीचा आकार यामुळे शस्त्रक्रियेतील आव्हान वाढले होते. म्हणूनच दुर्बिणीतून सुरक्षित आणि परिणामकारक शस्त्रक्रिया करणे हा पर्याय निवडला. रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर ७२ तासांनी घरी पाठवण्यात आले. आता सर्जरीनंतर तिच्या लक्षणात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.