Pune News : रद्द केलेल्या विमान तिकिटाचे पैसे मेक माय ट्रीपने ग्राहकाला परत करावे; अतिरिक्त ग्राहक आयोगाचा आदेश

बुक केलेली विमानाची तिकिटे रद्द केल्यानंतर ई-कुपन, सेवा कराचे शुल्क वजा करून उर्वरित रक्कम परत न देणे टूर कंपनीला महागात पडले
cancel flight ticket by make my trip should pay back to customer consumer court pune
cancel flight ticket by make my trip should pay back to customer consumer court puneSakal
Updated on

Pune News: बुक केलेली विमानाची तिकिटे रद्द केल्यानंतर ई-कुपन, सेवा कराचे शुल्क वजा करून उर्वरित रक्कम परत न देणे टूर कंपनीला महागात पडले आहे. तक्रारदार ग्राहकाला दोन लाख ८४ हजार १४ रुपये २०१९ पासून व्याजासह द्यावेत, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक आयोगाने दिला आहे.

आयोगाचे अध्यक्ष जयंत देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे, प्रणाली सावंत यांनी हा निकाल दिला. याबाबत कोरेगाव पार्क येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने अ‍ॅड. शशी शेट्टी यांच्यामार्फत मेक माय ट्रीप (इंडिया) प्रा. लि. कंपनी विरुद्ध ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती.

तक्रारदार यांनी पत्नीसह शिकागो, मियामी आणि लॉस एंजलिस येथे सहलीचे नियोजन केले होते. त्यासाठी त्यांनी कंपनीकडे विमानांची १३ तिकिटे बुक केली होती. त्यासाठी तक्रारदारांनी तीन लाख ४ हजार ४४० रुपये दिले होते.

त्यानंतर काही कारणास्तव तक्रारदारांनी स्वतः तिकीट रद्द केले. १६ एप्रिल २०१९ ला कंपनीने तक्रारदारांना ई-मेल पाठवून तिकीट रद्द केल्याचे, ई-कुपन आणि सेवा कराचे शुल्क वजा करून राहिलेल्या रकमेपैकी दोन लाख ८४ हजार १४ रुपये १२ तासांमध्ये परत करण्याचे आश्वासन दिले.

मात्र, आश्वासन न पाळता कंपनीने तक्रारदारांना रक्कम परत केली नाही. वेळोवेळी पैशांची मागणी केली असता कंपनीकडून खोटी आश्वासने देण्यात आली. नोटिशीला कंपनीने प्रतिसाद न दिल्याने तक्रारदारांनी तक्रार दाखल केली, असे त्यांनी केलेल्या दाव्यात नमूद आहे.

संधी देवूनही म्हणणे मांडले नाही

नोटीस मिळाल्यानंतर कंपनी वकिलामार्फत आयोगासमोर हजर झाली. मात्र संधी देवूनही त्यांनी लेखी जबाब सादर केला नाही. तक्रारदारांनी सादर केलेले शपथपत्र, लेखी युक्तिवाद, कंपनीतर्फे करण्यात आलेला युक्तिवाद लक्षात घेत आयोगाने तक्रारदारांना दोन लाख ८४ हजार १४ रुपये वार्षिक सात टक्के व्याजाने देण्याचा आदेश कंपनीला दिला. तसेच, नुकसान भरपाई पोटी ३० हजार, तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये द्यावे, असे आदेशात नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.