'हर हर महादेव' चित्रपटाचा मंगला चित्रपटगृहातील आजचा शो आम्ही रद्द करायला लावला आहे. शहरातील इतर चित्रपटगृहांतील शो देखील तत्काळ बंद करावेत.
पुणे - इतिहासाची मोडतोड करून 'हर हर महादेव' हा चित्रपट तयार केला आहे, असा आरोप करत शहरातील या चित्रपटांचे सर्व शो बंद करावे, तसेच सरकारने देखील या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने सोमवारी केली. या मागणीसाठी संघटनेतर्फे मंगला चित्रपटगृहासमोर निदर्शनेही करण्यात आली.
'हर हर महादेव' चित्रपटाचा मंगला चित्रपटगृहातील आजचा शो आम्ही रद्द करायला लावला आहे. शहरातील इतर चित्रपटगृहांतील शो देखील तत्काळ बंद करावेत, यासाठी चित्रपटगृह चालकांना पत्र दिले असल्याचे ब्रिगेडचे राज्य प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी सांगितले. शिंदे म्हणाले, "हर हर महादेव चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ही बदनामी आहे. नुकतीच घोषणा करण्यात आलेल्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटातही मावळ्यांचे अक्राळविक्राळ रूप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. लेखक, दिग्दर्शक, कलाकारांनी आमच्या गौरवशाली इतिहासाची बदनामी तात्काळ थांबवावी, अन्यथा हे चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही."
यावेळी संभाजी ब्रिगेडचे महानगर अध्यक्ष अविनाश मोहिते, तसेच संदीप कारेकर, नरेश पडवळ, अमर गजघाटे, अभिजीत मोरे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संजय पासलकर, अजय पाटील, रविंद्र कंक, सविता बलकवडे, महेश बांदल, अर्चित बांदल आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.