Accident : मालवाहू ट्रकला कारची धडक; तीन जण जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली हद्दीत मालवाहू ट्रकला पाठीमागून कारने धडक दिली.
Accident
Accidentsakal
Updated on

कुरकुंभ - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली हद्दीत मालवाहू ट्रकला पाठीमागून कारने धडक दिल्याने कारमधील तीन जण जागीच ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातातील मृत व जखमी कामानिमित्त सध्या पिंपरी चिंचवड परिसरात वास्तव्याला आहेत. हा अपघात मंगळवारी (ता. १३) सकाळी झाल्याची माहिती पोलिस हवालदार एन. एस. भागवत यांनी दिली.

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली दत्ताकला महाविद्यालयकडे जाणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ पुणे-सोलापूर महामार्गावरून पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या कारने (एमएच. १२, एलजे. ६०५४ ) पाठीमागून मालवाहू ट्रकला (एमएच. ०९, सीए. ३६६२) पाठीमागून धडक दिल्याने या कारच्या चेंदामेंदा झाला.

अपघातात कारमधील राजू बबरूवान म्हस्के (वय ५२), राधिका अजय म्हस्के (वय २२, रा. अजिंठानगर, पिंपरी चिंचवड, पुणे) व बुवासाहेब दत्तात्रेय धेंडे (वय ४८, रा. जोतिबाचीनाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर) हे तीन गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले. तर अजय राजू म्हस्के (वय २६) व काजल राजू म्हस्के (वय २३ दोघेही रा. अजिंठानगर पिंपरी चिंचवड, पुणे) हे दोन जण गंभीर जखमी झाले.

जखमींना तातडीने स्थानिक ग्रामस्थांनी भिगवण येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताचा गुन्हा भिगवण (ता. इंदापूर) पोलिस चौकीत दाखल करण्यात आला आहे. म्हस्के कुटुंब आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी पुण्याहून गावाकडे कारमध्ये जात होते. अपघातातील मृतदेह भिगवण येथे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

अपघातात मृत्यू झालेल्या राधिकाचा मागील जानेवारी महिन्यात जखमी झालेल्या अजय म्हस्के यांच्याशी विवाह झाला होता. अपघाताचा पुढील तपास दौंड पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.