Accident : कारची दुचाकीला धडक, तिघे जण गंभीर जखमी; अपघातानंतर कारमधील तिघांनी आपापसात चक्क चालक बदलला

चालक एक, गुन्हा दुसऱ्यावर, पोलिसांनी खाक्या दाखवताच मूळ चालक समोर.
Crime
Crimesakal
Updated on

वाघोली - अपघातानंतर कार मधील तिघांनी आपापसात चक्क कारचा चालक बदलला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. नातेवाईकांनी आक्षेप घेतला. अन् पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच मूळ चालकाचे नाव समोर आले. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुणे नगर महामार्गावर घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ढोरे व त्याचे दोन मित्र नवनाथ ज्ञानेश्वर हरगुडे, विनायक ज्ञानेश्वर ढोरे हे रविवारी रात्री दुचाकीवर जात असताना समोरून केसनंद कडून लोणीकंद कडे जाणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. यानंतर कार मधील चोरमोले हा पळून गेला. बाकी दोघांनी चोरमोलेच चालक असल्याचे व घाबरून पळून गेल्याचे सांगीतले.

याबाबत कुमार जयसिंग ढोरे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चालक म्हणून नवनाथ चोरमोले ( रा. शिरसवडी, हवेली, पुणे ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र नंतर नातेवाईकांनी आक्षेप घेवून चोरमोले हा चालक नसल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता प्रथम त्याने आपणच चालक असल्याचे सांगितले.

मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने मूळ चालकाचे नाव अक्षय गायकवाड असल्याचे सांगितले. यानंतर गायकवाड याच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. गायकवाड याने आपणावर दबाव आणल्याने आपण चालक असल्याचे चोरमोले याने सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान पोलिसांनी दुसऱ्याच चालकावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

मात्र यामध्ये पोलिसांची कोणतीही चूक नसून फिर्यादीनुसार व बाकी दोघांनी सांगितल्यानुसारच चोरमोले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र नातेवाईकांनी आक्षेप घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली. त्याने गायकवाड चालक असल्याचे सांगितले. यानंतर खोटी माहिती दिल्याचा अधिकचां गुन्हा चोरमोले याच्यावर दाखल केल्याचे लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी सांगितले. तिन्ही जखमींवर खराडी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com