Startup : करिअरला स्टार्टअपचे बूस्टर

नोव्हेंबर २०२२ पर्यंत भारतीय स्टार्टअप्सने तब्बल २५ अब्ज रुपयांची गुंतवणूक खेचून आणल्याचे फिनट्रेकरच्या मासिक अहवालातून समोर आले आहे.
Startup
StartupSakal
Updated on
Summary

नोव्हेंबर २०२२ पर्यंत भारतीय स्टार्टअप्सने तब्बल २५ अब्ज रुपयांची गुंतवणूक खेचून आणल्याचे फिनट्रेकरच्या मासिक अहवालातून समोर आले आहे.

पुणे - नोव्हेंबर २०२२ पर्यंत भारतीय स्टार्टअप्सने तब्बल २५ अब्ज रुपयांची गुंतवणूक खेचून आणल्याचे फिनट्रेकरच्या मासिक अहवालातून समोर आले आहे. एकीकडे आयटी क्षेत्रात नोकरी जाण्याचे प्रमाण वाढले (ले-ऑफ) असून, दुसरीकडे स्टार्टअप्समध्ये नव्या नोकरीच्या संधी वाढत चालल्या आहे. राज्यातील निम्म्याहून अधिक स्टार्टअप्स हे पुणे-मुंबई परिसरात असून, स्टार्टअप ही एक सुवर्णसंधी असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

पुण्यातील स्टार्टअप्सची क्षेत्रे

पुण्यात आरोग्य, जैवतंत्रज्ञान, अर्थ व बँकिंग सेवा, वाहनोद्योगाशी संबंधित स्टार्टअप्सची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान, कृषी, अन्नप्रक्रिया, शिक्षण, आशयनिर्मिती व प्रक्रिया या क्षेत्रातील स्टार्टअप्स पुणे परिसरात मोठ्या संख्येने कार्यरत आहेत.

डेकाकॉर्नचा दर्जा

युनिकॉर्ननंतर, कंपनीचा डेकाकॉर्न बनण्याचा प्रवास सुरू होतो. जेव्हा कंपनी नफा कमावताना १० अब्ज डॉलरचे मूल्यांकन प्राप्त करते. तेव्हा ती कंपनी डेकाकॉर्न होतो.

स्टार्टअप म्हणजे काय?

नव्याने स्थापित केलेला व्यवसाय अथवा उद्योग, ज्याचे उत्पादन किंवा सेवा ही पूर्णतः नवीन असते. बहुतेक स्टार्टअप्स हे समविचारी लोकांनी एकत्र येत एखाद्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर काम करत सुरू झाले आहे.

स्टार्टअप सुरू करताना

तुमची स्टार्टअप आयडिया पूर्णतः नवीन आणि युनिक असावी. आयटीतील असायलाच हवी असे नाही. पावभाजी विकणे हेही स्टार्टअप असू शकते. भांडवल कुणाचे? काम कोण करणार? कल्पना कोण साकारणार? विक्री कोण करणार? व्यवस्थापन कुणाकडे? या जबाबदारीची योग्य विभागणी करा. सोशल कॅपिटल उभारा. पॅशनने जगणाऱ्यांना एकत्र करा.

स्टार्टअप युनिकॉर्न कधी बनतो?

जेव्हा एखादी कंपनी एका छोट्या मुल्यांकनाने सुरू होते व नंतर व्यवहारांत वाढ होत कंपनीचे मूल्यांकन एक अब्ज डॉलर्स किंवा त्याहून अधिक होते.

सध्या स्टार्टअप्समध्ये मुबलक नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होत आहेत. या क्षेत्रात उत्तम दीर्घकालीन करिअर करण्यासाठी प्रत्येकाने निरंतर शिक्षण व कौशल्य विकास करणे अनिवार्य आहे. स्टार्टअप्समधील नोकऱ्या प्रस्थापित कंपनीसारखी स्थिरता देऊ शकत नाहीत. मात्र, नवीन युगातील तंत्रज्ञान व प्रक्रियांवर काम करण्याची संधी देतात.

- प्रशांत गिरबाने, महासंचालक, एमसीसीआयए

स्टार्टअपसाठी कौशल्ये

  • वेळेचे योग्य नियोजन

  • आकलन क्षमता

  • संघभावना

  • इंग्रजीत संभाषण कौशल्य

  • सादरीकरणाचे कौशल्य

  • ई-मेल लिहिण्याचे कौशल्य

  • संगणकाचे ज्ञान आवश्‍यक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.