शिक्रापूर - केंदूर (ता. शिरूर) येथील एकाने आपल्या सख्ख्या चुलतभावाला जिवे मारण्याच्या हेतूने मोटारीने धडक दिली आणि या धडकेत बोनेटवर पडलेल्या जखमी भावाला तब्बल ५०० मीटर फरफटत नेल्याचा प्रकार घडला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
विनायक सदाशिव थिटे, वृषाली विनायक थिटे, गणेश सदाशिव थिटे, सारीका गणेश थिटे, अमित सदाशिव थिटे, कोमल अमित थिटे, सदाशिव बुधाजी थिटे, मधुरा गणेश थिटे व अथर्व विनायक थिटे (सर्व रा. थिटेआळी, केंदूर, ता. शिरूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जखमी राजेंद्र नाथू थिटे यांनी फिर्याद दिली आहे.