पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीशीसंलग्न महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी कॅस (करिअर ऍडव्हान्समेंट स्कीम) अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या मुलाखती पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच येत्या काही दिवसांत "कॅस'चे कामकाज पूर्ण न झाल्यास विद्यापीठाच्या 9 आणि 10 जानेवारी 2021मध्ये होणाऱ्या अधिसभेसमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेने (स्पुक्टो) दिला आहे.
पुणे विद्यापीठातर्फे मार्च-2020 मध्ये संलग्न महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकांच्या "कॅस'च्या मुलाखती घेतल्या जाणार होत्या. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मुलाखतींना स्थगित देण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मुलाखती घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, अंतिम वर्षाच्या परीक्षांचे काम आणि लॉकडाऊनमुळे प्रवासावर येणाऱ्या बंधनांमुळे त्यावेळीही "कॅस'च्या मुलाखती स्थगित केल्या. त्यानंतर विद्यापीठाने 22 ते 28 डिसेंबर दरम्यान "कॅस' अंतर्गत 484 प्राध्यापकांच्या मुलाखती घेतल्या जातील, असे स्पष्ट केले होते. परंतु पुन्हा एकदा विद्यापीठाने मुलाखती पुढे ढकलल्या.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
विद्यापीठाकडून वारंवार प्राध्यापकांच्या मुलाखती पुढे ढकलल्या जात असल्याने अध्यापक संघटनेतर्फे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. परंतु 8 जानेवारीपर्यंत कॅसची प्रक्रिया पूर्ण न केल्यास विद्यापीठाच्या अधिसभेसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.
प्राध्यापकांच्या "कॅस'बाबत शासनाने आदेश दिले असताना विद्यापीठाकडून प्राध्यापकांच्या "कॅस'अंतर्गत मुलाखती वारंवार रद्द केल्या जात आहेत. त्यामुळे प्राध्यापक संघटनेच्या मंगळवारी झाल्या बैठकीत 9 आणि 10 जानेवारी 2021 दरम्यान होणाऱ्या अधिसभेसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.-प्रा. एस. पी. लवांडे, सचिव, एम. फुक्टो
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.