कोरेगांव पार्कमधील हॉटेल्सविरुद्ध गुन्हा दाखल; कोरोना नियमांचे उल्लंघन

case filed against 4 Hotels in koregaon park pune for violating curfew rules
case filed against 4 Hotels in koregaon park pune for violating curfew rules
Updated on

पुणे : शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच कोरोना संबंधीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी शहरातील काही नामांकित हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

कोरेगाव पार्कमधील लेन क्रमांक 6 मधील हॉटेल मर्फीज, लेन क्रमांक 7 मधील हॉटेल टल्ली, हॉटेल डेली, हॉटेल पब्लिक अशी कारवाई करण्यात आलेल्या हॉटेल्सची नावे आहेत. संचार मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 188, 269 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ब नुसार हॉटेल्सच्या व्यवस्थापकांविरुद्ध कोरेगांव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहरातील हॉटेल्समध्ये आसन क्षमता व हॉटेलमधील ग्राहकांची संख्या ही हॉटेल्सच्या बाहेर दर्शनी भागात बोर्डवर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतानाही संबंधीत हॉटेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार हॉटेलवर कारवाई करण्यात आली. कोरेगांव पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.