पुणे : कालीचरण महाराज आणि मिलींद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल

चिथावणीखोर भाषणे केल्याप्रकरणी कालीचरण महाराज आणि मिलींद एकबोटे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल
Case File Against Kalicharan Maharaj & Milind Ekbote
Case File Against Kalicharan Maharaj & Milind Ekbotesakal
Updated on

पुणे : समस्त हिंदू आघाडी संघटनेतर्फे आयोजित शिवप्रतापदिन (अफझलखान वधाचा आनंदोत्सव) कार्यक्रमात समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे भडकाऊ आणि चिथावणीखोर भाषणे केल्याप्रकरणी कालीचरण महाराज आणि समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलींद एकबोटे यांच्यासह सहा जणांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिलींद रमाकांत एकबोटे, मोहनराव शेटे, दिपक बाबुलाल नागपुरे, कालीचरण महाराज (रा. अकोला), कॅप्टन दिगेंद्रकुमार (रा. राजस्थान), नंदकिशोर रमाकांत एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Case filed against Kalicharan Maharaj and Milind Ekbote)

Case File Against Kalicharan Maharaj & Milind Ekbote
'भाजपला एक कोटी मतं द्या, फक्त 50 रुपयांत दारू देऊ'

खडक पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई सदानंद ढगे यांनी याबाबत फिर्याद दिली होती. 19 डिसेंबर रोजी नातुबाग मैदानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समस्त हिंदू आघाडी संघटनेतर्फे शिवप्रतापदिन आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी हजर राहुन आरोपांनी मुस्लीम व ख्रिश्चन धर्माच्या नागरिकांच्या भावना दुखावल्या जातील. तसेच धार्मीक श्रध्दांचा अपमान करुन धार्मीकभावनांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने हावभाव करुन दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे भडकाऊ आणि चिथावणीखोर भाषणे केली. सुत्रसंचलन करताना नंदकिशोर एकबोटे यांनी इतरांच्या भाषणांचा त्यांच्या बोलण्यात पुन्हा थोडक्यात उल्लेख करुन तेथे जमलेल्या लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. खडक पोलिस या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.(provocative speeches that would create a divide in the society)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.