Sunil Kamble : भाजप आमदाराविरोधात गुन्हा दाखल! पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावणं भोवलं

भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी शुक्रवारी दोन जणांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यापैकी एक जण पोलिस आहे
Sunil Kamble Video
Sunil Kamble VideoEsakal
Updated on

भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी शुक्रवारी दोन जणांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यापैकी एक जण पोलिस आहे. दुसऱ्या व्यक्तीचे नाव जितेंद्र सातव असे असून ते राष्ट्रवादी वैद्यकीय मदत सेलचे प्रमुख आहेत. ऑन ड्युटी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलल्याने कांबळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बंडगार्डन पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ससून रुग्णालयातील नव्या इमारतीचे उद्घाटन आणि विविध सेवांचे लोकार्पण असा कार्यक्रम होता. कोनशिलेवर कांबळे यांचे नाव नव्हते. ते पुण्यातील कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. शुक्रवारी सकाळपासूनच ते स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करीत होते. तेव्हा व्यासपीठावर अजित पवार उपस्थित असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्याचवेळी कांबळे यांनी सातव यांना फटका मारल्याचे सांगण्यात आले.

Sunil Kamble Video
Loksabha Election : महायुतीचं ठरलं! समरजीत घाटगेंचा आमदारकीचा मार्ग मोकळा, मुश्रीफ कोल्हापुरातून लढवणार लोकसभा?

दुसरा प्रकार बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील महात्मा गांधी सभागृहात घडला. कार्यक्रम संपल्यानंतर कांबळे व्यासपीठावरून खाली उतरत होते. त्यावेळी साध्या वेशातील पोलिसाच्या गालावर त्यांनी मारले. दरम्यान, सभागृहातून बाहेर पडताच कांबळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशीही वाद घातला. ससून रुग्णालय ज्या भागात आहे तेथील स्थानिक आमदार असूनही माझे नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्या वेळी डॉ. देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झालेल्या पत्रव्यवहाराची प्रती मोबाईलवर दाखविल्या. त्यामुळे नावाबाबतची चूक आपल्या कार्यालयातून झाली नसल्याचे त्यांनी त्याच वेळी स्पष्ट केले.

सोशल मीडिया वर व्हायरल झालेल्या या व्हिडीओ ने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून लावली होती. विरोधकांनी देखील भाजप आणि सरकार विरोधात टिप्पणी केली होती. रात्री अखेर या पोलीस काँन्स्टेबल शिवाजी सरक यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sunil Kamble Video
मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी १६९ प्रश्न! सामाजिक बाबींवरील ‘या’ प्रश्नांची उत्तरे आरक्षणास ठरणार महत्त्वाची; जाणून घ्या प्रश्नावली

‘मारहाणीचा उद्देश नव्हता’

या पार्श्वभूमीवर संपर्क साधला असता कांबळे म्हणाले, “मी व्यासपीठावरून खाली उतरत असताना संबंधित पोलिस कर्मचारी माझ्या अंगावर पडले. त्यातून तोल सावरत त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला, अन्यथा मीच खाली पडलो असतो. कोणालाही कोणत्याही स्वरूपाची मारहाण करण्याचा उद्देश नव्हता.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.