बेकायदा भिशीच्या नावाखाली कोटयावंधींची फसवणुक; 'शेठ'सह दोघांवर गुन्हा दाखल

A case has been registered against Fraud of crores under the guise of illegal Bhishi
A case has been registered against Fraud of crores under the guise of illegal Bhishi
Updated on

उरुळी कांचन (पुणे) : बेकायदा भिशीत गुंतवणुकीच्या नावाखाली लोणी काळभोर, उरुळी कांचन, कुंजीरवाडीसह पुर्व हवेलीमधील 500हून अधिक बड्या गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील हिरेन भरतकुमार जोशी या 'शेठ' सह त्याच्या दोन नातेवाईकांच्या विरोधात फसवणुकीचा पहिला गुन्हा लोणी काळभोर पोलिसात शुक्रवारी (ता. २५) रात्री उशीरा दाखल झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोणी काळभोर येथील गोदाम व्यावसायिक ज्ञानेश्वर नारायण काळभोर (वय- 55 वर्षे, रा. धुमाळ मळा रोड, लोणी काळभोर, ता.हवेली) यांनी हिरेन भरतकुमार जोशी या शेठसह, शेठचे वडील, भरतकुमार चरणदास जोशी व शेठचा भाऊ, दिपक भरतकुमार जोशी रा. तिघेही, उरुळी कांचन ता. हवेली) या तिघांच्या विरोधात भिशीमधील गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याच्या नावाखाली एक कोटी रुपयांची फसवणुक केल्याची तक्रार दिली आहे. 

दरम्यान बेकायदा भिशीत गुंतवणुकीच्या नावाखाली उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका नामांकित व्यापाऱ्याने लोणी काळभोर, उरुळी कांचन, हडपसरसह पुर्व हवेलीमधील पाचशेहून अधिक "बड्या" गुंतवणुकदारांच्याकडुन दोनशे कोटीहुन अधिक रुपयांची माया गोळा करुन पलायन केल्याबाबतची बातमी "सकाळ" ने आठ दिवसापुर्वीच प्रसिध्द केली होती. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हिरेन जोशी हा उरुळी कांचन परीसरातील नामांकित व्यापारी असुन, मागिल सात वर्षापासुन उऱुळी कांचन व परीसरात बेकायदा भिशीचा व्यवसाय चालवत आहे. महिण्याला लाख रुपयापासुन दहा लाख रुपयांच्या भिशा जोशी चालवत आहे. भिशीत पैसे लावल्यास, सदर पैशावर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवल्याने, पुर्व हवेलीमधील अनेकांनी जोशी यांच्याकडे कोट्यवधी रुपये गुंतवले आहेत. सुरुवातीला गुतुंवणुकदारांना परतावा वेळच्यावेळी मिळत होता. मात्र मागील कांही दिवसापासुन परतावा मिळणे बंद झाल्याने गुंतवणुकदारात मोठी खळबळ उडाली होती. गुंतवणुकदार वसुलीसाठी घरी येत असल्याचे लक्षात येताच, शेठ व त्यांच्या घरातील सदस्यांनी पलायन केले होते. याबाबत 'सकाळ'मध्ये बातमी प्रसिध्द होताच, गुंतवणुकदारांनी पोलिसात धाव घेतली होती. 


याबाबत अधिक माहिती देतांना, लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले, लोणी काळभोर येथील गोदाम व्यावसायिक ज्ञानेश्वर काळभोर यांनी हिरेनकुमार जोशी याच्यासह, वडील भरतकुमार जोशी, व धाकटा भाऊ दिपक जोशी या तिघांच्या विरोधात, गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याच्या नावाखाली एक कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. जोशी यांनी वरील फसवणुक मागील सात वर्षाच्या काळात केलेली आहे. जोशी याच्या विरोधात आणखी काही जणांनी लेखी स्वरुपात तक्रारी दिलेल्या आहेत. याही तक्रारीची खातरजमा करण्याचे काम चालु आहे. जोशी यांनी काळभोर यांच्या प्रमाणेच आणखी काही लोकांची फसवणुक केल्याची चर्चा आमच्या कानावर आली आहे. ज्ञानेश्वर काळभोर यांच्या प्रमानेच जोशी यांनी आणखी कोणाची आर्थिक फसवणुक केली असेल तर, फसवणुक झालेल्या नागरीकांनी तात्काळ लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क साधुन तक्रार करावी असे आवाहनही सुरज बंडगर यांनी केले आहे. 

गुंतवणुकदारांची अवस्था, तोंड दाबुन भुक्क्याचा मार!

हिरेन जोशी या शेठकडे पुर्व हवेलीमधील पाचशेहुन अधिक गुंतवणुकदारांनी दोशने कोटीहुन अधिक रक्कम गुंतवल्याची चर्चा आहे. मात्र, गुतंवलेला कोट्यावधी रुपयांचा काळा पैसा पोलिसांना कसा दाखवायचा या भितीने गुतवणुकदारांची इकडे आड तिकडे विहीर असी अवस्था झाली आहे. यामुळे शेठ ने किमान दोनशे कोटीहुन अधिक रकमेचा गंडा घातला असला तरी, गुंतवणुकदारांनी शेठच्या विरोधात गुन्हा मात्र दाखल करण्यास टाळाटाळ सुरु केली आहे. ज्ञानेश्वर काळभोर यांनी एक कोटी रुपयांची फसवणुक झाल्याची तक्रार दिलेली असली तरी, ही तक्रार म्हणजे हिमनगाचे एक टोक असल्याचे फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांचे म्हणणे आहे. यामुळे पुढील एक दोन दिवसात तक्रारीचा वेग वाढु शकतो अशी चर्चा गुंतवणुकदारात चालु झाली आहे.
 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.