पुणे : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांना जिवे मारण्याची धमकी आली होती. तुमचा दाभोळकर करू, अशी धमकी श्याम मानव यांना देण्यात आली होती. त्यानंतर श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.
धिरेंद्र महाराजांच्या भक्तांकडून ही धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्याम या प्रकरणी पुण्यातील हिंजवडीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा
याप्रकरणी श्याम मानव यांच्या मुलाने तक्रार दिली. हिंजवडीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्याम मानव यांच्या विरोधात काही कट रचून त्यांना मारण्याचा प्रयत्न होता. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. पुढील कारवाई हिंजवडी पोलीस करत आहेत.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते व श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाईलवर हे धमकीचे मॅसेज करण्यात आले आहेत, अशी माहिती कार्यकर्ते हरीश देशमुख यांनी दिली होती. तुमचा दाभोळकर करु, अशी धमकी श्याम मानव यांना देण्यात आली होती. यापूर्वी देखील श्याम मानव यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला आहे होता. सभा संपताच काही कार्यकर्त्यांनी उभे राहत त्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी केली होती.
श्याम मानव हे फक्त हिंदु धर्माच्या विरोधात बोलून हिंदू धर्माला बदनाम करतात. त्यांनी धिरेंद्र कृष्ण महराज यांची पोलखोल केली नाही. फक्त हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी सभेचा वापर केला, असा आरोप तरुणांकडून करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.