औंध - येथील नागरस रस्त्यावरील सुप्रिया टॉवर्स सोसायटीमधील एका कुटुंबाशी दुजाभाव करुन त्यांना बहिष्कृत केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सोसायटीच्या ११ सदस्यांसह पोस्टमनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सोसायटीच्या सदस्यांसह इतर सर्व सदनिकाधारकांनी सर्व आरोप फेटाळले असून, हा एक खोटा प्रकार असल्याचे म्हटले आहे.