Pune News : माजी नगरसेवक अभिजित बाळासाहेब शिवरकर यांच्यावर गुन्हा दाखल

जमिनीच्या वादातून केल महिलेचा विनयभंग
case registered against former corporator Abhijit Balasaheb Shivarkar woman abuse land dispute
case registered against former corporator Abhijit Balasaheb Shivarkar woman abuse land disputeSakal
Updated on

पुणे : जमिनीला टाकण्यात येत असलेले कुंपण आणि हद्दीच्या वादातून जमीन मालक महिलेला धमकावून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजित यांच्यासह १० जणांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अभिजित बाळासाहेब शिवरकर, भास्कर रत्नाकर गायकवाड, त्यांची पत्नी, मुलगा, राजेश खैरालिया, किरण छेत्री (रा. वानवडी गाव) यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन परिसरात महिलेची वडिलोपार्जित जागा आहे.

त्या जागेची त्यांनी भूमापन अधिकाऱ्यांकडून सरकारी मोजणी केली होती. मोजणीनंतर त्या ठिकाणी कुंपण घालण्याचे काम सुरू होते. त्यावेळी शिवरकर यांनी कुंपण घालत असलेल्या कामगारांना रोखले व खांब काढून टाकले.

case registered against former corporator Abhijit Balasaheb Shivarkar woman abuse land dispute
Pune Crime : उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन सराईत गुन्हेगार तीन जिल्ह्यांतून हद्दपार

‘आम्ही जमीन मालक आहोत,’ असे म्हणत शिवरकर आणि गायकवाड यांनी महिलेला शिवीगाळ केली. तसेच त्यांनी महिलेला तेथून हाकलून लावले. ‘पुन्हा या परिसरात दिसल्यास जीवे मारू, अशी धमकी व त्यांचा विनयभंग केला.

खोटे आरोप करून माझ्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे. तक्रारदार महिला कोण आहेत हे देखील मला माहिती नाही. चौकशीबाबत मला पोलिसांनी नोटीस दिली आहे. चौकशीस माझे संपूर्ण सहकार्य असेल. मात्र तक्रारदार यांच्या म्हणण्याप्रमाणे कोणताही प्रकार मी केलेला नाही.

- अभिजित शिवरकर, माजी नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.