Pune Crime : पत्नीचा छळ केल्याप्रकरणी अनिवासी भारतीय पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पत्नीचा शारीरिक, मानसिक छळ आर्थिक कुचंबणा आणि कौटुंबिक हिंसाचार केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी अनिवासी भारतीय पती, सासू-सासऱ्यासह चौघांविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल केला.
Crime
Crimeesakal
Updated on

पुणे - पत्नीचा शारीरिक, मानसिक छळ आर्थिक कुचंबणा आणि कौटुंबिक हिंसाचार केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी अनिवासी भारतीय पती, सासू-सासऱ्यासह चौघांविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका महिलेने (रा. सॅलिसबरी पार्क, पुणे) स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चंद्रशेखर बबनराव महाले, बबनराव तात्या महाले, हेमलता बबनराव महाले (तिघे सध्या रा. चॅंडलर, ॲरिझोना, अमेरिका) आणि नामदेव पवार (रा. स्वारगेट) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.