Pune Police : गृहमंत्री अमित शहा, चंद्रकांत पाटलांवर आक्षेपार्ह टिप्पणी; कन्नडच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल

जाधव यांनी गृहमंत्री अमित शहांविषयी अत्यंत खालच्या पातळीवर टीका केलीय.
Kannada former MLA Harshvardhan Jadhav
Kannada former MLA Harshvardhan Jadhav esakal
Updated on
Summary

जाधव यांनी गृहमंत्री अमित शहांविषयी अत्यंत खालच्या पातळीवर टीका केलीय.

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दत्तवाडी पोलिस ठाण्यात (Dattawadi Police Station) जाधव यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका महिलेनं हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात ही तक्रार दिलीय. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या राहत्या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला. या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह, तसंच खालच्या पातळीवर बोलताना दिसले.

Kannada former MLA Harshvardhan Jadhav
Tawang Clash : शत्रूंच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी आम्ही तयार आहोत; संरक्षण मंत्रालयाचा चीनसह पाकिस्तानला इशारा

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी सोशल माध्यमांवर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरत त्यांची बदनामी केलीय. याशिवाय, गृहमंत्री अमित शहांविषयी अत्यंत खालच्या पातळीवर भाषा वापरत लैंगिक स्वरूपाची टिप्पणी केलीय. याच पार्श्वभूमीवर जाधव यांच्यावर भारतीय दंडात्मक कलम ३५४ (अ), ५०९, ५०१, ५०५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Kannada former MLA Harshvardhan Jadhav
Kiren Rijiju : भारत-चीन वाद सुरु असतानाच कायदामंत्र्यांनी शेअर केला 'तो' जुना फोटो; काँग्रेसनं केली पोलखोल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.