पुणे
Pune News : जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी महंत रामगिरी महाराजांविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल
जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी महंत रामगिरी महाराज यांच्याविरुध्द खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे - जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी महंत रामगिरी महाराज यांच्याविरुध्द खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शोएब इस्माईल शेख (वय ६२, रा. घोरपडे पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून महंत रामगिरी महाराज (रा. सद॒गुरू गंगागिरी महाराज संस्थान, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.