Pune : भटक्या कुत्र्यांना खाद्य देणाऱ्या महिलेस मारहाणच महिला पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

भटक्या श्वानांना खाद्यासाठी भटकंती करताना अपघात होतात आणि निष्पाप जीव जातो
 case registered against woman police officer for beating up woman who feeding stray dogs marathi news pune
case registered against woman police officer for beating up woman who feeding stray dogs marathi news puneSakal
Updated on

धायरी : भटक्या श्वानांना खाद्य का देते, यावरून महिला पोलिस कर्मचाऱ्याने एका महिलेस मारहाण करून खाद्य फेकून दिले. हा प्रकार डीएसके विश्व येथील चंद्रमा सोसायटी परिसरात घडला. या प्रकरणी महिला पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी मोहिनी पैठणकर कुलकर्णी यांच्याविरुध्द पुणे ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भटक्या श्वानांना खाद्यासाठी भटकंती करताना अपघात होतात आणि निष्पाप जीव जातो. या मुक्या प्राण्यांना खाद्य पुरविण्याचे काम गेल्या मनिषा पवार अनेक वर्षांपासून करता. एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने श्वानांसाठी आणलेले खाद्य फेकून दिले. माजी मंत्री मनेका गांधी यांनी पोलिस आयुक्तांशी संपर्क साधून या विषयात लक्ष घालण्याची मागणी केली. याबाबत पवार यांनी पशुसंवर्धन तक्रार विभागाकडे तक्रार केली.

तसेच हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पैठणकर- कुलकर्णी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात हवेलीचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे म्हणाले, या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली आहे. त्याचा अहवाल ग्रामीण पोलिस अधीक्षकांना पाठवण्यात आला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.