Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील सीसीटीव्ही फुटेज् अन् आरोपींच्या माहितीचा ताळमेळ बसेना, नेमकं काय झालं?

Pune Porsche Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील संबध असलेल्या ब्लॅक व कोझी पबच्या मालकासह व्यवस्थापकाला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Pune Porsche Accident
Pune Porsche AccidentEsakal
Updated on

पुणे: भरधाव वेगात महागडी कार चालवीत दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण व तरुणीच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांनी कोझी व ब्लॅक पब येथील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेले फुटेज व आरोपींकडून तपासादरम्यान देण्यात आलेली माहिती यामध्ये मोठी तफावत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

ब्लॅकमधील कामगारांनी अल्पवयीन मुलांना टेबलवर मद्य पुरविल्याचेही पोलिस तपासातून पुढे आले आहे. बेदरकारपणे कार चालविणाऱ्या मुलासह इतर अल्पवयीन मुलांना पबमध्ये मद्य पुरविल्याप्रकरणी दोन्ही पब मालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यातील तिघांना मंगळवारी (वय २१) अटक करण्यात आली. कोझी पबचे मालक नमन प्रल्हाद भुतडा (वय २५, रा. ए ७, पद्म विलास एन्क्लेव्ह, वानवडी), व्यवस्थापक सचिन अशोक काटकर (वय ३५, रा. साईसदन ए २, तुकाईदर्शन, हडपसर) आणि ब्लॅक पबचे मालक संदीप रमेश सांगळे (वय ३५, रा. ऑस्कर शाळेसमोर, फ्लॅट नं. १०७, पद्मावती हाईट्स, केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकार पक्षाकडून करण्यात आली.

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल कोण? किती आहे संपत्ती

ब्लॅक पबमधील कामगारांनी अल्पवयीन मुलांना टेबलवर मद्य पुरविल्याचे पोलिस तपासात सांगितले आहे. पोलिसांकडे प्राप्त झालेल्या सिसीटीव्ही फुटेजवरून आरोपींनी त्यांच्या पबमध्ये अल्पवयीन मुलगा व त्याच्या मित्रांच्या वयाची खात्री करता मद्य पुरविल्याचे दिसते. तसेच हॉटेलमध्ये दर्शनी भागावर कोठेही बाल न्याय अधिनियम कलम ७७ प्रमाणे नोटीस किंवा सूचना लावलेली नसल्याने आरोपींनी गुन्हा केल्याचे सिद्ध होत असल्याचे सरकारी वकील विद्या विभूते आणि योगेश कदम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीला शिक्षा होणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत

कोझीच्या मालकाला नोटीस

या प्रकरणात कोझीचे मालक प्रल्हाद बद्रिनारायण भुतडा (वय ५८) यांकडे गुन्ह्यासंदर्भात चौकशी करण्यात आली. यावेळी, त्यांनी मुलगा नमन भुतडा व व्यवस्थापक सचिन काटकर हे प्रत्यक्षात पबचे व्यवस्थापन पाहत असल्याची माहिती दिली. त्यानंतर, प्रल्हाद भुतडा यांना नोटीस देऊन तपास कामासाठी बोलावण्यात येईल तेव्हा हजर राहण्याच्या सूचना देऊन सोडण्यात आले आहे. या गुन्ह्यातील आरोपी ब्लॅकच्या बार काऊंटरचा व्यवस्थापक जयेश बोनकर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला आहे.

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल कोण? किती आहे संपत्ती

तिघांची २४ मेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी

अल्पवयीन मुलगा व त्याच्या मित्रांच्या वयाची खात्री न करता त्यांना मद्य पुरविण्यात आले. याबाबत त्याकडे विचारपूस करून ते रेकॉर्ड तपासासाठी जप्त करायचे आहे. अल्पवयीन मुलाला पबमध्ये मद्य पिण्याची मुभा व परवानगी देण्यामध्ये दोन्ही पब मालकांचा काय सहभाग आहे. हॉटेलचे प्रत्यक्ष व्यवस्थापन कोण पाहते. त्यांचा गुन्ह्यात सहभाग आहे का? याविषयी अटक आरोपींकडे सखोल तपास करायचा आहे.

हॉटेलचे मुख्य मालक व इतर व्यवस्थापन पाहणारे व्यवस्थापक यांचा या गुन्ह्यात सहभाग आहे का? यादृष्टीने तपास करायचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी ॲड. विभूते व ॲड. कदम यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत न्यायालयाने आरोपींना २४ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. बचावपक्षातर्फे अ‍ॅड. एस. के. जैन आणि ॲड. अमोल डांगे यांनी बाजू मांडली. या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची परवानगी मिळण्याचा अर्ज ॲड. असीम सरोदे यांनी केला होता. तो अर्ज न्यायालयाने मान्य केला.

अल्पवयीन मुलांना पबमध्ये दारू देणे हा अदखलपात्र गुन्हा आहे. तर मोटार वाहन कायद्यानुसार दाखल असलेल्या कलमांबाबतची कारवाई योग्य नाही. कारण आरोपी मोटारीचे मालक नाहीत. तसेच त्या अनुषंगाने त्यांच्या गुन्ह्यात काहीच सहभाग नाही. त्यामुळे एकूण अटकेची कारवार्इ बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद ॲड. जैन यांनी केला.

पबचे या बाबींकडे दुर्लक्ष

- पबमध्ये प्रवेश देताना मुलांच्या वयाची विचारपूस केली नाही

- सदस्य नसताना पबमध्ये प्रवेश देण्यात आला

- अल्पवयीन मुलांना प्रवेश दिला जाणार नसल्याचा फलक लावला नाही

- बार काऊटरला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाने दारू प्यायलेला पब करण्यात आला सील; मालकासह मॅनेजरला ४ दिवसांची कोठडी

आरोपींकडे पुढील मुद्यांचा तपास होणार

- दारू पिण्यासाठी आलेल्यांकडे दारू पिण्याच्या परवान्याबाबत काय खात्री केली

- आरोपींनी अल्पवयीन मुलास कोणत्या पबच्या सदस्यच्या नावाने प्रवेश दिला

- अल्पवपयीन आरोपीसह त्याच्या मित्राला मद्य पुरविल्यानंतर दिलेले बिल व केलेल्या पेमेंटचा तपशील

- पबचे परवाने आणि त्यांच्या सभासदांची नावांची माहिती घेऊन तपासणी करणार

- अल्पवयीन मुलांना मद्य पिण्यास परवानगी देण्यात पबच्या मालकांचा सहभाग आहे का

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident: आमदार टिंगरेंनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर अजितदादांचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन; काय झाली चर्चा?

पबमध्ये जाण्याची परवानगी कशी मिळाली

क्लॅब पब केवळ सदस्यत्व असलेल्यांना सोडण्यात येते. त्यामुळे अल्पवयीन मुलांकडे या क्लबचे सदस्यत्व आहे का? किंवा कोणाच्या सदस्यत्वावर पबमध्ये गेले. अनेक पब असलेल्या या पब चालकांकडून नियमांची पायमल्ली होत असेल तर त्यातून चुकीचा संदेश जाते. त्यामुळे याबाबत सखोल तपास आवश्यक आहे, असे या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक गणेश माने यांनी न्यायालयास सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.