लिनेस क्लब ऑफ इंदापूर सिटी च्या वतीने कालावधीमध्ये सेवा सप्ताह साजरा

इंदापूर नगरपरिषदेतील सफाई कामगारांना गोड पुरणपोळीची मेजवानी.
pune
punesakal
Updated on

इंदापूर : शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्या साठी समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या सफाई कामगारांना लिनेस क्लब ऑफ इंदापूर सिटी च्या वतीने पुरणपोळीची मेजवानी देण्यात आली. विशेष म्हणजे लिनेस क्लब अध्यक्षा सायरा आतार, सदस्या शामला घासकाटू, उज्ज्वला गायकवाड, अर्चना शिंदे, कल्पना भोर, लता नागपुरे, उर्मिला होमकर यांनी स्वतः घास आपुलकीचा या उपक्रमाअंतर्गत पुरणपोळी तयार करून सफाई कामगारांना वाढली. आई,बहिणीच्या मायेने गरमगरम पुरणपोळी खायला मिळाल्याने तसेच करत असलेल्या कार्याची दखल घेतली गेल्याने कामगार तृप्त झाले. नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सचिव मुकुंद शहा, नगरपरिषद मुख्याधिकारी रामराजे कापरे, कार्यालय अधीक्षक गजानन पुंडे यांनी या उपक्रमात सहभागी होत क्लब उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

सुरवातीस नगरपरिषद कामगार व उपस्थित मान्यवरांचे औक्षण स्वागत करण्यात आले.

यावेळी लिनेस क्लब ऑफ इंदापूर सिटीच्या अध्यक्षा सायरा आतार म्हणाल्या, शहरात गेली पंधरा वर्षांपासून आम्ही लायनेस क्लब मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले. आता लिनेस क्लब ची स्थापना झाली असून क्लबमार्फत दि.२ ऑक्टोबर पासूनसेवासप्ताह सुरू केला. यानिमित्त नगरपरिषद कर्मचारी, सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला. इंदापूर शहर स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त ठेवणाऱ्या सफाई कामगारांना पुरणपोळीजेवण मेजवानी देण्यात आली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी हमीद आतार, प्रा. भिमराव भोर, बाळासाहेब नागपुरे, रोहन भोर आदींनी प्रयत्न केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.